Yes Bank Loan Details

Yes Bank Loan Details : येस बँक नाव तुम्ही ऐकलं असेल मागच्या काही कालावधीमध्ये भरपूर चर्चेत आलेली ही बँक वेगवेगळ्या कारणामुळे मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये य बँकेची भरपूर चर्चा झाली, शहरी भागात सर्वाधिक शाखा असणारी येस बँक १२०० हुन अधिक शाखेसह 710 शहरांमध्ये कार्यरत आहे.

एकूण 8.2 मिलियन ग्राहक आणि 1300 प्लस एटीएम सह हे बँक संपूर्ण भारतभर कार्य करते भारतासोबतच भारताच्या बाहेर सुद्धा ही बँक कार्यरत आहे. येस बँकेची स्थापना राणा कपूर आणि अशोक कपूर आणि सन 2005 मध्ये केली आहे.

या बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून या बँकेमार्फत विविध सुविधा ग्राहकांना दिल्या जातात त्यामध्ये चालू खाते, बचत खाते असो किंवा सॅलरी अकाउंट असो यासोबतच ग्राहकांना कंजूमर लोन, कमर्शियल लोन, रुरल आणि ऍग्री लोन आणि इन्स्टंट लोन तसेच विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सुद्धा बँकेत मार्फत दिले जाते.

कर्ज, कार्ड आणि खात्याव्यतिरिक्त ही बँक इन्शुरन्स मध्ये सुद्धा काम करते विविध प्रकारचे इन्शुरन्स बँके मार्फत दिली जातात आपण या बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्ज विषयी माहिती घेणार आहोत आणि त्या कर्जासाठी अर्ज कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल याची माहिती सुद्धा पाहणार आहोत.

कंजूमर लोन

या प्रकारामध्ये बँक पर्सनल लोन, कार लोन, यूज कार लोन, होम लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, लोन अगेन्स्ट सेक्युरिटी, बिझनेस लोन या प्रकारचे कर्ज दिले जाते, सर्वसाधारण ग्राहकांना लागणारे सर्व कर्ज उपलब्ध आहेत.

लोन सेक्शन मध्ये गेल्यानंतर याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता वैयक्तिक कर्जापासून गृहकर्ज पर्यंत सगळे कर्ज येस बँक देते त्यांच्या व्याजदर सुद्धा खूप चांगला असल्यामुळे तुम्ही येस बँकेतून कर्ज घेण्यास प्राधान्य देऊ शकता.

कमर्शियल लोन (Yes Bank Loan Details)

कमर्शियल लोनच्या पर्यायाअंतर्गत ही बँक कमर्शियल वाहनासाठी कर्जाचा पुरवठा करते यासोबतच कमर्शियल इक्विपमेंट किंवा कमर्शियल कन्स्ट्रक्शन साठी सुद्धा लोन देते, तुमच्याकडे कोणते प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट तुम्ही कर्ज काढू शकता.

यासोबतच ही बँक बिजनेस लोनचा सुद्धा पर्याय ग्राहक समोर ठेवते बिजनेस लोन मध्ये तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही हे कर्ज मिळवू शकता, याचा व्याजदर सुद्धा खूप कमी असल्यामुळे तुम्ही सहज अर्ज करू शकता याच्यासाठी आवश्यक असलेले पात्रता त्याची बेनिफिट्स तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

कमीत कमी 30 लाखाचा तुमचा दरवर्षाचा टर्नओव्हर असेल तर तुम्ही ही कर्ज घेऊ शकते यासाठी तुमचं वय 22 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे यासाठी 15.99% व्याजदर लागू होतो बाकीचे स्टॅम्प ड्युटी आणि इतर चार्जेसची माहिती तुम्ही बघितल्यावर पाहू शकता.

कमीत कमी कागदपत्रांमध्ये ही बँक कर्जाचा पुरवठा करते या कर्जासाठी अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्ज, पॅन कार्ड, आधार कार्ड, व्यवसायाचे प्रूफ आणि ते तर आवश्यक आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन तुम्हाला द्यावे लागेल यासोबतच आणखी काही कागदपत्रे बँकेने मागितले तर हे सुद्धा द्यावे लागतील.

तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला येस बँकेच वेबसाईटवर जाऊन कमर्शियल लोन हा पर्याय निवडावा लागेल त्यातून बिजनेस लोन या पर्यायावर जाऊन रिक्वेस्ट कॉल बॅक हा ऑप्शन तुम्हाला निवडावा लागेल तुम्ही जर अगोदरचे बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला लगेच कॉल येऊ शकतो.

एकदा तुम्ही या कर्जासाठी अप्लाय केले की तेथील रिलेशनशिप मॅनेजर येतील आणि पुढची प्रक्रिया पार पाडतील याची कागदपत्रे सुद्धा बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत सर्व कागदपत्रे तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता.

एमएसएमई लोन (MSME Loan)

लहान छोट्या व मध्यम व्यवसायासाठी सुद्धा येस बँक कर्जाचा पुरवठा करते स्कोर कार्ड बेसलेंडिंग मध्ये ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विसेसच्या बिझनेस ला येस बँक कर्ज पुरवठा देतात, यासाठी टेक्नॉलॉवर बेस हे कर्ज तुम्हाला मिळते.

फ्लेक्सिबल कॉलेट्रोल रिक्वायरमेंट बँक कडे तुम्हाला द्यावे लागते त्यानंतर हे बँक तुम्हाला कर्ज चा पुरवठा करतो या बँके मार्फत ओव्हर ड्राफ्ट ची फॅसिलिटी सुद्धा आहे, कॅपिटल लिमिटच्या दीड करोड पर्यंत तुम्ही हि

फॅसिलिटी युज करू शकता, कोणतेही बॅलन्स याच्यासाठी लागत नाही किंवा इतर कोणत्या कागदपत्रची सुद्धा गरज असणार नाही, SME सेक्टर मध्ये ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विसेस ला कर्जाचा पुरवठा करते.

येस बँक एग्रीकल्चर सेक्टर मध्ये आवश्यक असणाऱ्या बाबीसाठी कर्ज देते, एग्री फूड बिजनेस असतील तर यासाठी क्रेडिट फॅसिलिटी येस बँक देऊ करते. कमीत कमी एक लाखापासून जास्तीत जास्त पाच करोड पर्यंत तुम्हाला हे कर्ज मिळते.

एका दिवसामध्ये याचा अप्रोल मिळतं कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला हे कर्ज दिले जाते ऍग्री सेक्टर मधील ट्रेडर प्रोसेस असतील तर यासाठी हे कर्ज अत्यंत उपयोगी पडणार आहे. एमएसएमई कर्जामध्ये येस GST नावाने एक कर्ज येस बँक प्रोव्हाइड करते.

यामध्ये एक करोड पर्यंत कॅपिटल फायनान्स तुम्हाला दिले जाते कमीत कमी कागदपत्रांमध्ये लवकरात लवकर तुम्हाला मिळते यामध्ये एप्लीकेशन फॉर्म, मागच्या सहा महिन्याचे जीएसटी रिटर्नस, KYC डॉक्युमेंट्स, सॅंक्शन लेटर याच्या अगोदरचे लोन असतील तर कॉन्स्टिट्यूशन आणि मॅनेजमेंटचे सर्टिफिकेट येथे लागणार आहे यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज बँकेच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता.

रुरल येस बँक लोन (Yes Bank Loan Details)

गावातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाचा पुरवठा करते किसान क्रेडिट कार्ड द्वारे हे बँक दोन करोड पर्यंत लोन देऊ शकते यासोबतच तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा 25 लाखापर्यंत तुम्ही कर्ज बँकेकडून घेऊ शकता.

हे कर्ज तुम्हाला सहा वर्षांमध्ये फेडायचा आहे मायक्रो इंटरप्राईजेस मध्ये जो तुम्ही काम करत असाल तर दोन करोड पर्यंत तुम्हाला लोन मिळते दहा वर्षांमध्ये लोन तुम्हाला फेडायचा असते, याची सविस्तर माहिती सुद्धा बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही माहिती पाहू शकता.

वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात तुमच्याकडे जमीन असेल तर त्याद्वारे तुमचे एलिजिबिलिटी चेक केल्या जाते दोन्ही करोड पर्यंत तुम्हाला लोनचे शेतीसाठी या कर्ज चा वापर करू शकता यासाठी तुम्हाला जागेचे कागदपत्र अगोदरच कर्ज असेल तर त्याचा रेकॉर्ड आणि बँकेने मागितल्यानंतर इतर कागदपत्र सादर करायला लागतात.

याचे व्याजदर कमीत कमी 10.50% पासून 12.29% पर्यंत तुम्हाला हे कर्ज मिळतात त्याच्या चार्जेस ची माहिती सुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन त्याची माहिती पाहू शकता, खाली बँकेचे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे तिथे संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही कर्ज विषयीची माहिती घेऊ शकता.

कर्जासाठी येस बँकेचे संकेतस्थळ : https://www.yesbank.in/yes-bank-loans

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *