Union Bank Loan : सन 2020 मध्ये आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक युनियन बँकेमध्ये विलीन करण्यात आल्या या बँकेच्या विलीनीकरणानंतर युनियन बँकेच्या 8 हजार 500 डोमेस्टिक शाखा झाल्यात, दहा हजाराहून अधिक एटीएम झाले आणि या बँकेमध्ये 76 हजार 700 कर्मचारी आहेत.
30 सप्टेंबर 2023 रोजी बँकेची मालमत्ता एकूण 01 कोटी 98 लाख 4842 करोड रुपये होते या बँकेच्या शाखा महाराष्ट्र सह भारतभर आहेत यासह दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, लंडनमध्ये आणि मलेशियामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ही बँक काम करते. या बँकेमार्फत बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव, एटीएम/डेबिट कार्ड इत्यादीचा पुरवठा केला जातो.
मोबाईल ॲप्लिकेशन अंतर्गत या बँकेच्या प्रॉडक्ट ची माहिती तुम्ही घेऊ शकता या सुविधा व्यतिरिक्त युनियन बँक विविध प्रकारचे कर्ज देऊ करते या कर्जामध्ये साधारणता वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादीचा समावेश होतो, युनियन बँक (Union Bank Loan) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा कर्जाचे वितरण करते.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर काही वेळा मध्ये तुम्हाला कर्जाचा पुरवठा केला जातो तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. बँकेत ज्या मुख्यता कर्जामध्ये कार्य करते त्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही खाली बघू शकता.
वैयक्तिक कर्ज (Union Bank Personal Loan)
युनियन बँक महिलांसाठी, पगारदार वर्गांसाठी, पगार नसलेल्या वर्गांसाठी, व्यावसायिकासाठी वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते, युनियन बँकेचे व्याजदर चांगले आहे तुमच्या सिबिलनुसार आणि तुमच्या शेवटच्या व्यवहारानुसार व्याजदराची स्थिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला किती व्याजदर लागेल हे सुद्धा तुम्ही बघू शकता.
यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं कमीत कमी होय 21 वर्ष असाव जर तुम्ही पगारदार वर्गातून येत असेल तर आणि इतर वर्गातून येत असेल तर तुमचं वय कमीत कमी 23 वर्ष असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त 65 वर्ष पर्यंत तुम्ही वैयक्तिक (Union Bank Loan) कर्जासाठी अर्ज करू शकता.
तुमच्या सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला गॅरेंटर सुद्धा लागणार नाही, डॉक्युमेंट्स काय काय लागतील कोणत्या प्रकारचे कागदपत्र तुम्हाला येथे गरजेचे असतील हे तुम्ही पाहू शकता. 50 लाखापर्यंत युनियन बँक वैयक्तिक कर्ज देते जर तुमचा 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर तुमचा व्याजदर सुद्धा चांगला तुम्हाला मिळू शकतो.
गृह कर्ज (Union Bank Home Loan)
युनियन बँक त्यांच्या विविध योजना अंतर्गत गृह कर्जाचा (Union Bank Loan) पुरवठा करते यामध्ये जागा घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी,फ्लॅट रिनोव्हेशन करण्यासाठी सुद्धा गृह कर्जाचा पुरवठा करते.
ही बँक युनियन होम, युनियन आवास लोन, लोन परचेस ऑफ फ्लॅट, युनियन स्मार्ट सेव्ह, युनियन रुफटॉप सोलर या योजनेअंतर्गत गृह कर्जाचा पुरवठा चांगल्या व्याजदरामध्ये करते, गृह कर्ज चा व्याजदर 8.30% पासून पुढे तुम्हाला लागतो सिबिल स्कोर चांगला असेल त्यापेक्षा कमी व्याजदर सुद्धा तुम्हाला मिळू शकतो.
शैक्षणिक कर्ज (Union Bank Loan – Education Loan)
युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तुम्हाला देशामध्ये शिकण्यासाठी किंवा परदेशामध्ये शिकण्यासाठी शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो, यामध्ये अंडर ग्रॅज्युएट साठी, पोस्ट ग्रॅज्युएट साठी आणि भारत सरकारच्या विविध योजना अंतर्गत तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.
यामध्ये स्किल डेव्हलपमेंट लोन, सीजीएफएसएल फोर स्टुडन्ट ऑफ प्रीमियर मॅनेजमेंट द्वारे शैक्षणिक कर्ज तुम्हाला मिळू शकते, दीड लाखापासून चाळीस लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज युनियन बँक ऑफ इंडिया देऊ करते.
वाहन कर्ज (Union Bank Vehicle Loan)
युनियन बँक मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे वाहन कर्ज दिले जात त्यामध्ये युनियन माइल्स आणि युनियन ग्रीन व्हाईल्स या दोन योजना अंतर्गत वाहन कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिक गाडी घेऊ इच्छित असाल तर युनियन बँकेचे युनियन ग्रीन वेहिकल्स हे प्रॉडक्ट तुमच्या अत्यंत उपयोगाचे आहे.
कमीत कमी व्याजदर आणि सरकारी सबसिडी सह तुम्ही युनियन बँकेकडून वाहन कर्ज घेऊ शकता जर तुम्ही इतर वाहन घेत असाल तर युनियन बँकेचे हे कर्ज तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी पडू शकतात. ऑनलाइन कर्ज युनियन बँक सर्व प्रकारचे कर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देते.
यामध्ये तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही होम लोन, वाहन लोन, शैक्षणिक लोन, केसीसी कृषी कर्ज, एमएसएमई लोन, मुद्रा लोन, पर्सनल लोन, नारीशक्ती जीएसटी लोन, युनियन डिजिटल एज्युकेशन लोन, डिजिटल गोल्ड लोन, डिजिटल पर्सनल लोन, डिजिटल युनियन किसान तत्काळ लोन यासाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने तुम्ही जर अर्ज करत असाल तर युनियन बँकेचे अधिकृत वेबसाईट https://www.unionbankofindia.co.in/ वर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि चांगले व्याजदरामध्ये तुम्ही युनियन बँकेचे कर्ज घेऊ शकता.