UCO Bank Loan : एक तरी भारतीय बँक असावी म्हणून श्री जी डी बिर्ला यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान युको बँकेची स्थापना केली 06 जानेवारी 1943 ला युनायटेड कमर्शियल बँकेचा जन्म झाला या बँकेचे हेड ऑफिस कोलकाता येथे आहे. संपूर्ण भारतभर या बँकेच्या तीन हजाराहून अधिक शाखा आहेत 1969 साली ही बँक सरकारी बँक म्हणून गणल्या जाऊ लागली, युनायटेड कमर्शियल बँक ही राष्ट्रीयकृत बँक झाली.
2000 करोडची उत्पन्न झाल्यानंतर 2012 साली हे बँकेचे शेअर होल्डिंग 65.19% सरकारकडे होते, 1985 मध्ये द युनायटेड कमर्शियल बँकेचे नाव बदलून युको बँक करण्यात आले आणि या बँकेच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. युको बँक अंतर्गत विविध प्रकारच्या सुविधा ग्राहकांना पुरवल्या जातात.
सध्या या बँकेचे श्री आस्वानी कुमार हे CEO आहेत या बँकेमध्ये चालू खाते, बचत खाते, सरकारी योजना, विमा, डेबिट कार्ड, सोनेतारण कर्ज याव्यतिरिक्त इन्स्टंट सेविंग अकाउंट सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. या बँकेमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करू इच्छित असाल तर या बँकेच्या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट सुद्धा तुम्ही काढू शकता.
म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा हे बँक कार्य करते ,इन्शुरन्स मध्ये ही बँक लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स मध्ये सुद्धा कार्य करते, ज्यामध्ये एलआयसी, एसबीआय लाइफ, ओरिएंटल इन्शुरन्स, स्टार हेल्थ, आदित्य बिर्ला इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स समावेश आहे.
सरकारच्या विविध योजनांमध्ये ही बँक कार्य करत असून यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शन, एमपीएसपीएम, जे जे बी वाय, पी एम एस बी वाय, सीनियर सिटीजन सेविंग टॅक्स पेमेंट आणि पीपीएफ मध्ये सुद्धा या बँकेचे कार्य चालते.
वरील सर्व कामाव्यतिरिक्त ही बँक विविध प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना देते ज्यामध्ये कृषी कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज या महत्त्वाच्या कर्जाचा समावेश आहे.
सरकारी योजना अंतर्गत राबवले जाणारे किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा लोन आणि इतर प्रकारचे MSME कर्ज सुद्धा या बँकेमार्फत दिल्या जाते,विविध प्रकारचे कर्ज बँकेमार्फत दिल्या जाते. काही महत्त्वाच्या कर्जाची सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता.
कृषी कर्ज (UCO Bank Loan – Agriculture Loan)
शेतीमध्ये लागणारे विविध अवजारांसाठी किंवा शेतीच्या वाढीसाठी इतर गुंतवणूक तुम्हाला करायचे असेल तर (UCO Bank Loan) युको बँक तुम्हाला 20 लाखापर्यंत कर्ज देऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक रित्या अर्ज करत असाल तर जास्तीत जास्त 25 लाख आणि जर ग्रुप मध्ये तुम्ही अर्ज करत असाल तर जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत हे बँक कर्ज देते.
पाच ते दहा वर्षांमध्ये तुम्हाला या बँकेच्या कर्जाची परतफेड करायला लागते, यादरम्यान तुम्हाला 36 ते 44 टक्क्याचे सबसिडी सुद्धा सरकारकडून उपलब्ध होते, बँकेचा व्याजदर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता.
कृषी कर्ज अंतर्गत विविध प्रकारची कर्ज युको बँक देते यामध्ये ॲग्री मुद्रा लोन, ऍग्री क्लीनिक अँड ऍग्री बिझनेस सेंट्रल लोन, ॲनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एग्रीकल्चर मार्केटिंग कनकधारा स्कीम, एग्रीकल्चर इम्प्रेस स्ट्रक्चर फंड, युको फूड अँड ऍग्रो प्रोसेसिंग युनिट स्क्रीन हाऊस फार्मिंग, केसीसी गोल्ड लोन, युको किसान लोन, पीएम ट्रॅक्टर आणि पावर टेलर लोन सुद्धा या बँकेमध्ये दिले जाते.
यासोबतच किसान क्रेडिट कार्ड, युको किसान भूमी,युको किसान तात्काळ स्कीम या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.
शैक्षणिक कर्ज (UCO Bank Education Loan)
युको बँक मार्फत देशामध्ये आणि परदेशामध्ये शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो तसेच अनेक कर्जामध्ये एज्युकेशन सुपर, प्रीमियर एज्युकेशन या कर्जाचा समावेश होतो.
हे कर्ज तुम्ही भारतात किंवा भारताच्या बाहेर जर शिकत असाल तर त्याचा वापर करू शकता. या कर्जासाठी (UCO Bank Loan) तुम्ही जर पदवीधर असेल तर तुमचं वय 28 वर्ष असावा आणि जर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुमच्या जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत असाव. भारतामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असेल तर दहा लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळते.
भारताच्या बाहेर जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर 20 लाखापर्यंतच कर्ज तुम्हाला दिल्या जाते, कोणत्या प्रकारचे सिक्युरिटी इथे तुम्हाला लागत नाही हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त पंधरा वर्षांमध्ये 180 हप्त्यामध्ये फेडू शकता. तुमचा कोर्स संपल्यानंतर एका वर्षांनी या कर्जाची परतफेड तुम्हाला करायला लागते.
गृह कर्ज (UCO Bank Loan – Home Loan)
युको बँके अंतर्गत गृह कर्ज सुद्धा चांगल्या व्याजदरावर दिले जाते या गृह कर्जामध्ये तुम्ही लोन टॉप होम लोन किंवा रेगुलर होम लोन सुद्धा घेऊ शकता. ८.४५ टक्क्यापासून बँकेचे व्याजदर चालू असून तुमच्या सिबिल स्कोर नुसार व्याजाचा दर हा वाढत जातो.
तुमचा सिबिल स्कोर जर 800 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 8.45 टक्के एवढे व्याजदर लागते आणि जर तुमच्या सिविल स्कोर 650 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 9.45% एवढा व्याजदर लागू शकतो यामध्ये जर महिलांच्या नावावर मालमत्ता असेल तर 0.05% एवढे व्याजदर कमी केले जात.
तुम्ही जर गृह कर्ज घेण्याची इच्छुक असाल तुम्हाला वेगवेगळ्या कारणासाठी गृह कर्जाचा पुरवठा युको बँकेतर्फे केला जातो याविषयीचे सविस्तर माहिती युको बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता
वैयक्तिक कर्ज (UCO Bank Personal Loan)
परदेशात फिरण्यासाठी, घर पुनर्बांधणी करण्यासाठी, लग्नासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी वैयक्तिक कर्जाचा चांगला उपयोग होतो, चांगल्या व्याजदरामध्ये युको बँक वैयक्तिक कर्ज चा पुरवठा करते, कमीत कमी कागदपत्रांमध्ये युको बँकेचे वैयक्तिक कर्ज (UCO Bank Loan) तुम्ही घेऊ शकता.
तब्बल 15 लाखापर्यंत युको बँक वैयक्तिक कर्ज देते हे वैयक्तिक कर्ज तुमच्या दर महिन्याच्या कमाईवर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुद्धा तुमच्या सिबिल स्कोरनुसार ठरवला जातो 650 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर 11.95% ने 775 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर 10.95% एवढा व्याजदर युको बँक पगारदार वर्गांसाठी,व्यावसायिकासाठी सरकारी कर्मचारीसाठी वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.
ही बँक एकूण कर्जाच्या 1 टक्के एवढी रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून घेते युको बँकेचे हे कर्ज तुम्ही 60 हप्त्यामध्ये फेडू शकतात, सरकारी कर्मचारी असेल तर हे कर्ज तुम्ही 84 हप्त्यामध्ये सुद्धा खेळू शकता.
वाहन कर्ज (UCO Bank Vehicle Loan)
दुचाकी किंवा चारचाकी घेणे सर्वांच्या स्वप्न दुचाकी घेतल्यानंतर त्याला चारचाकी साठी आपली धडपड असता जर तुम्ही कार घेऊ इच्छिता युको बँकेच्या विविध योजना अंतर्गत तुम्ही कार घेऊ शकता. यामध्ये युको बँकेचा कॉम्बो कार स्कीम अंतर्गत तुम्ही होम लोन आणि कार्लोन एकाच वेळेस घेऊ शकता.
टू व्हीलर स्कीम अंतर्गत तुम्ही दुचाकी साठी सुद्धा कर्ज युको बँक मार्फत घेऊ शकता युको बँकेचा कार या ऑप्शन मध्ये तुम्ही 90% पर्यंत कर्ज (UCO Bank Loan) घेऊ शकता आणि त्याची परतफेड तुम्ही 84 महिन्यासाठी आहे दोन्ही कारमध्ये म्हणजे जुन्या आणि नवीन कार मध्ये तुम्हाला 90% पर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो.
यासाठी 60 ते 84 हप्त्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतो कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नसल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या स्वरूपाचे कर्ज येथे मिळत.
तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्याकडे पगार येत नसेल तरीही तुम्ही या बँके मार्फत कारण घेऊ शकता जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेत असाल तर यामध्ये कमीत कमी व्याजदरात तुम्हाला हे बँक कर्जाचा पुरवठा करते. जर तुमच्या सिबिल स्कोर 800 पेक्षा जास्त असेल तर 8.60% या दराने तुम्हाला वाहन कर्जाचा हप्ता फेडावा लागतो.
सोने तारण कर्ज (UCO Bank Loan – Gold Loan)
अत्यंत गरजेचे समयी आपल्याकडे सोन असेल ते सोने बँकेमध्ये ठेवून त्याबद्दल तुम्हाला हवी ती रक्कम तुमच्याकडून घेऊ शकता वैयक्तिक कर्जा शिक्षणासाठी, इतर महत्त्वाच्या कामासाठी ,शेतीच्या कोणत्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी तुम्ही सोनेतारण कर्जाचा पर्याय अवलंबू शकता.
22 कॅरेटचा 50 ग्रॅम पर्यंत सोन तुम्ही बँकेमध्ये ठेवून त्या बदल्यात या बँकेकडून सोनेतारण कर्ज घेऊ शकता यामध्ये कागदपत्राची कोणती प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. वर नमूद केलेल्या सर्व कर्ज (UCO Bank Loan) व्यतिरिक्त युको बँक आणखी वेगवेगळ्या कर्जाचा पुरवठा करते व वेगवेगळ्या सुविधा सुद्धा देतात.
तुम्हाला कर्ज विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर योग्य बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.ucobank.com/ ला भेट देऊन सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला लागणारे कर्ज तुम्ही काढू शकता व त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता.