TMB Loan Details

TMB Loan Details : द नादार बँक लिमिटेड म्हणून 11 मे 1921 रोजी तमिळनाडू मर्कंटाइल बँकेची स्थापना झाली. नादर महाजन संगम यांच्या ॲनिवरसरी निमित्त तूतुकोरिन येथे 1920 मध्ये एक सभा भरविण्यात आली, नादार कम्युनिटीसाठी ही सभा होती.

या सभेमध्ये 11 मे 1921 रोजी नादार बँक लिमिटेड ची स्थापना झाली या बँकेचे चेअरमन श्री एम व्ही सामोगवेल नादार हे होते 04 नोव्हेंबर 1921 रोजी ते या बँकेचे चेअरमन झाले, श्री टीव्ही बालगुरू स्वामी नादार यांनी 11 नोव्हेंबर 1921 रोजी सकाळी नऊ वाजता तूतुकोरिन येथे बँकेचे दार सर्वसामान्यांसाठी खुले केले.

तूतुकोरिन तमिळनाडू मधील एक जिल्हा आहे आणि महानगरपालिका सुद्धा आहे तमिळनाडू मर्कंटाइल बँक सर्वसामान्य ग्राहकांना विविध सुविधा पुरवण्यात जास्तीत जास्त पर्सनलाईज सर्विस पुरवण्यात गणल्या जाते, संपूर्ण भारतभर या बँकेचे नेटवर्क आहे.

सर्वात पहिले म्हणजे 1947 पर्यंत या बँकेचे चार शाखा होत्या तूतुकोरिन, मदुराई, शिवकाशी आणि वीरूधुनगर येथे ह्या चार शाखा कार्यरत होत्या , 1937 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे या बँकेची शाखा काढण्यात आली ही शाखा 1939 मध्ये बंद करण्यात आली.

बँक 536 शाखेसह 12 रीजनल ऑफिस,11 एक्सटेंशन काउंटर्स आणि दोन प्रोसेसिंग सेंटरसह संपूर्ण भारतभर कार्यरत आहे, या बँकेच्या 1149 एटीएम,334 कॅश रिसायकल मशीन आहेत संपूर्ण भारतभरात 536 शाखेला कनेक्ट केले आहेत. 11 नोव्हेंबर 2003 रोजी बँकेने एटीएम कार्ड लॉन्च केले त्यानंतर विविध सुविधा बँकेच्या सर्वसामान्य मिळत गेल्या.

या बँकेचा एचडीएफसी बँक आणि आयडीबीआय बँकेसोबत टाय-अप आहे, 1176 लोकेशनवर विविध सुविधेसह हि बँक कार्य करते. 31 मार्च 2023 रोजी या बँकेचा व्यवसाय 47766.11 करोड होता आणि या बँकेचा निव्वळ नफा 6984 करोड रुपये एवढा होता.

तमिळनाडू मर्कंटाइल बँका अंतर्गत विविध सुविधा सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जातात ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बचत खाते, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवीसाठीच्या स्कीम, विविध प्रकारच्या बँकिंग सर्विसेस त्या व्यतीरिक्त विविध प्रकारच्या इतर सर्विसेस सुद्धा ही बँक सर्वसामान्य नागरिकांना पुरवते.

या बँके अंतर्गत इतर सुविधा व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोन सुद्धा घेऊ शकता या (TMB Loan Details) कर्जामध्ये गृह कर्ज, चार चाकी कर्ज, दुचाकी साठी कर्ज,वैयक्तिक कर्ज, पेन्शनरसाठी कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, होम टॉप अप लोन इत्यादी कर्ज तुम्ही तमिळनाडू मर्कंटाइल बँकेतर्फे घेऊ शकता.

या बँकेमधल्या मुख्य पाच कर्जाची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत, या माहितीमधून तुम्ही कर्ज कशाप्रकारे घेऊ शकता त्यासाठी पात्रता काय असेल ही माहिती तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही या कर्जासाठी अर्ज सुद्धा करू शकणार आहात.

गृह कर्ज (TMB Loan Details – Home Loan)

तमिळनाडू मर्कंटाइल बँक 18 ते 55 वय असणाऱ्या अर्जदारांना 500 लाखापर्यंत गृह कर्जाचा पुरवठा करते. नवीन घर घेण्यासाठी, नवीन फ्लॅट घेण्यासाठी, जुनं घर विकत घेण्यासाठी, घर रेनोवेट करण्यासाठी तमिळनाडू मर्कंटाइल बँक कर्जाचा पुरवठा करते.

हे कर्ज तुम्ही 360 महिन्यांमध्ये परतफेड करू शकता हे कर्ज घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 50 वर्षे असणे आवश्यक आहे. तुमच्यासोबत जॉईंट बॉरोवर असेल तर त्याचा सुद्धा वय 50 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

सरकारी कर्मचारी असाल, पब्लिक सेक्टरमध्ये कर्मचारी असाल तर हि वयोमर्यादा साठ वर्षापर्यंत आहे जर तुमचा व्यवसाय असेल म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, लॉयर असाल तर त्याचं वय 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त पाचशे लाखापर्यंत ही बँक कर्ज देते हे कर्ज (TMB Loan Details) मेट्रोपोल्युशन सेंटर एरियामध्ये मिळतं 300 लाखापर्यंत कर्ज नॉन मेट्रोपोल्युशन सेंटरमध्ये मिळत, ज्यांचा आयटी रिटर्न उपलब्ध नाही अशांना फक्त 15 लाखापर्यंत कर्ज मिळते घर रेनोवेट करण्यासाठी 25 लाखापर्यंत कर्ज ही बँक देते.

तुम्ही फ्लॅट, प्लॉट, जुनी जागा घेऊ शकता सेक्युरिटी म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या घर फ्लॅट जागा किंवा कोणती इक्विपमेंट तुम्हाला बँकेकडे गहाण ठेवाव लागतो. यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून बँक 0.50 टक्के एवढी रक्कम तुमच्याकडून घेते.

कार लोन (TMB Car Loan)

तमिळनाडू मर्कंटाइल बँके अंतर्गत तुम्ही नवीन गाडीसाठी 200 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्यांसाठी तमिळनाडू मर्कंटाइल बँक कर्जाचा पुरवठा करते, जुन्या गाडीसाठी जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत ही बँक कर्ज देते.

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही जर पगारदार वर्गातून येतात असाल तर सॅलरी सर्टिफिकेट लागेल, जर दहा लाखाचं वर तुम्ही कर्ज घेत असाल तर मागचा आयटी रिटर्न लागेल, प्रोफेशनल, बिझनेस मॅन असाल तर मागच्या दोन वर्षाचा आयटी रिटर्न तुम्हाला बँकेकडे जमा करायला लागतो.

कोणीही वैयक्तिक, कंपनी, पार्टनरशिप फॉर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे (TMB Loan Details) कर्ज घेऊ शकते यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.25 लाख एवढ असणे आवश्यक आहे नवीन कर्ज घेण्यासाठी ही बँक 90% पर्यंत कर्जाचा पुरवठा करते जुन्या गाडीसाठी 70% पर्यंत कर्ज तुम्हाला पुरवल्या जाते.

नवीन गाडीचा हप्ता तुम्हाला 84 महिने भरावा लागतो तर जुन्या गाडीसाठी 60 महिन्यामध्ये तुम्ही परतफेड करू शकता. यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून एक टक्के एवढी रक्कम बँक आकारते.

दुचाकी कर्ज (TMB Two-Wheeler Loan)

तमिळनाड मर्कंटाइल बँक दुचाकीच्या 75% ऑन रोड फंडिंग वर तुम्हाला कर्ज (TMB Loan Details) देते हे कर्जाची परतफेड तुम्ही ईएमआय मध्ये करू शकता. नवीन गाडी घेण्यासाठी, वैयक्तिक उपयोगासाठी किंवा व्यावसायिक उपयोगासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकतात.

जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत तुम्हाला या बँकेमार्फत कर्ज दिल्या जाते, कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्ही हे कर्ज घेऊ शकता 35 EMI मध्ये तुम्हाला कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. याचा व्याजदर बँकेच्या वेबसाईटवर दिलेला आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर व्याजदराविषयी माहिती पाहू शकता.

वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जासाठी वेगवेगळे व्याजदर बँकेने आकारलेले आहेत, प्रक्रिया शुल्क म्हणून एक टक्के एवढी रक्कम ही बँक लोनच्या रकमेवर आकारते.

वैयक्तिक कर्ज (TMB Loan Details – Personal Loan)

तमिळनाडू मर्कंटाइल बँक लग्नाच्या खर्च भागवण्यासाठी, घरातल्या वस्तू विकत घेण्यासाठी, घरासाठी लागणारे आर्टिकल्स  घेण्यासाठी,  वैयक्तिक गरज भागविण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक मदत मिळावी म्हणून तुम्हाला वैयक्तिक कर्ज देऊ करते.

वैयक्तिक कर्ज एक लाखापासून दहा लाखापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना दिले जाते, यासाठी तुमचं वय 21 ते 54 वर्ष असणं गरजेचं आहे आणि तुमचा दरमहा पगार 20000 एवढा असण आवश्यक आहे, तुम्ही कोणत्याही सेक्टर मधले पर्मनंट कर्मचारी असाल तरच बँक तुम्हाला कर्ज देते.

हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 60 महिन्यांमध्ये परतफेड करू शकता, पाच लाखापर्यंत तुम्हाला कोणतीही गहाण ठेवण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु तुम्ही पाच लाखापेक्षा जास्त कर्ज (TMB Loan Details) घेत असाल तर तुम्हाला मोकळी जागा बिल्डिंग किंवा आवश्यक असलेल्या गोष्टी सिक्युरिटी म्हणून बँकेकडे गहाण ठेवावे लागतील.

यासाठीचा सुद्धा व्याजदर बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता प्रक्रिया शुल्क म्हणून एक टक्के एवढे रक्कम ही बँक वैयक्तिक कर्जासाठी (TMB Loan Details) आकारते.

शैक्षणिक कर्ज (TMB Loan Details – Education Loan)

भारतामध्ये भारताच्या बाहेर शिक्षणासाठी ही बँक 10 लाखापासून 20 लाखापर्यंत कर्ज देते, चार लाखापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही सेक्युरिटी या बँकेकडे देण्याचे गरज पडत नाही. तुम्ही भारताच्या बाहेर जर शिक्षण घेत असेल तर 20 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज तमिळनाडू मर्कंटाइल बँकेतर्फे मिळते.

जर तुम्ही भारतात शिक्षण घेत असाल तर 10 लाखापर्यंत ही बँक तुम्हाला कर्ज (TMB Loan Details) देते या कर्जावर तुम्हाला सबसिडी सुद्धा मिळू शकते, अशा विविध स्कीम तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे लोन घेण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे.

बँकेने जे कोर्सेस सांगितलेले आहेत त्या कोर्समध्ये तुम्ही ऍडमिशन घेणे गरजेचे आहे तरच तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता चार लाखाच्या वर तुम्ही कर्ज घेत असाल तर पाच टक्के एवढी मार्जिन बँक ठेवते भारताच्या बाहेर शिक्षणासाठी पंधरा टक्के मार्जिन ठेवते.

साडेसात लाख रुपयांचे वर कर्ज घेत असाल तर 20% मार्जिन ठेवते या बँकेचे कर्ज तुम्ही कोर्स संपल्यानंतर किंवा जॉब लागल्यानंतर सुद्धा भरू शकता जास्तीत जास्त पंधरा वर्षापर्यंत या कर्जाची रक्कम तुम्हाला फेडायची असते चार लाखापर्यंत कोणतीही सेक्युरिटी किंवा गॅरेंटर आवश्यक नाही.

चार लाख ते साडेसात लाखाच्या दरम्यान तुमचं कोणत्याही पालक गॅरेंटर असणे गरजेचे आहे, भारतामध्ये जर शिक्षण घेत असेल तर कोणतेही प्रक्रिया शुल्क बँका आकारत नाही. परंतु भारताबाहेर जर तुम्ही शिक्षण घेत असाल आणि साडेसात लाखाच्यावर कर्ज घेत असाल तर यावर बँक प्रक्रिया शुल्क आकारते 01 टक्के एवढा प्रक्रिया शुल्क तुम्हाला मिळालेल्या कर्जाच्या रकमेवर हे बँका करते.

कर्ज तमिळनाड मर्कंटाइल बँकेचे महत्त्वाचे पाच कर्ज (TMB Loan Details) होते या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता आणि आवश्यक असल्यास त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.

त्यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे https://tmb.in/ त्यावर गेल्यानंतर लोन या सेक्शनमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या कर्जाची माहिती दिली जाते त्याच्या व्याजदराविषयीची माहिती दिली जाते आणि अर्ज करण्याच्या पद्धती विषयी सुद्धा सांगितले जाते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *