State Bank Personal Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

State Bank Personal Loan : सर्वांना परिचित असणारी व सर्व गावाकडे तसेच शहरांमध्ये असणारी बँक म्हणजे भारतातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँक मार्फत ग्राहकांना विविध सुविधा पुरवल्या जातात ज्यामध्ये बचत खाते, चालू खाते,पगार खाते तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व वेगवेगळ्या प्रकारचे इन्वेस्टमेंट मध्ये ही बँक कार्य करते.

यासोबतच ही बँक वेगवेगळ्या विमा क्षेत्रात सुद्धा कार्य करते, या बँकअंतर्गत विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा केला जातो ज्यामध्ये होम लोन, पर्सनल लोन,एज्युकेशन लोन, गोल्ड लोन, सूर्य घर लोन चा समावेश आहे.

आजच्या लेखामध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पर्सनल लोन विषयी माहिती जाणून घेणार आहोत स्टेट बँक मधून तुम्ही पर्सनल लोन घेऊ इच्छित असाल तर चांगल्या फॅसिलिटी मध्ये ऑनलाईन पर्सनल स्टेट बँक ऑफ इंडिया देते.

कशासाठी मिळते कर्ज?

तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल आणि तुमचे सॅलरी अकाउंट येथे नसले तरी स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला कर्ज पुरवठा करते, इमर्जन्सीच्या वेळी लग्नात कार्यामध्ये तसेच इतर काही गोष्टीसाठी पैशाची गरज पडल्यानंतर आपण वैयक्तिक कर्ज चा विचार करतो.

हे वैयक्तिक कर्ज आपण चांगल्या बँकेतून घेतले तर कमी व्याजदर पण लागतो, आपण व्यवस्थितरित्या कर्जाचा परतावा केला तर भविष्यात या बँक आपल्याला प्रत्येक वेळी सहकार्य करतात, स्टेट बँक मध्ये तुम्हाला 20 लाखापर्यंत कमीत कमी व्याजदरावर कर्ज मिळत आणि तुमच्या उर्वरित बॅलन्स वर तुमच्या व्याजाची आकारणी केली जाते.

कमीत कमी प्रोसेसिंग चार्जेस आणि कमीत कमी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला इथे द्यायला लागतील जास्त डॉक्युमेंटचा पसारा येथे करायला लागत नाही, लवकरात लवकर तुमच्या प्रोसेस होऊन कर्जाचे पैसे अकाउंटला जमा होतत.

तारण व सेक्युरिटी ची गरज नाही (State Bank Personal Loan)

कोणतेही छुपे चार्जेस स्टेट बँक लावत नाही कोणतीहि सेक्युरिटी किंवा गॅरेंटर द्यायची सुद्धा तुम्हाला इथे गरज नाहीये, अगोदर जर स्टेट बँकेतून कर्ज काढल असेल तर तुम्ही परत बँकेतून कर्ज काढू शकता, तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल आणि तुमची सॅलरी कोणत्याहि बँकेत जमा होत असेल तरी तुम्ही इथे कर्जासाठी अर्ज करू शकता.

एवढा पगार आवश्यक

तुमचं महिन्याला कमीत कमी 15 हजार एवढे इनकम असण अपेक्षित आहे तुमच्या उत्पनाच्या जास्तीत जास्त 50% रकमेचे EMI तुम्ही जरी भरत असेल तर येथेही कर्ज घेऊ शकता, तुम्ही केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा पब्लिक सेक्टर मध्ये असाल अथवा प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड मध्ये कामाला असले तरी कर्ज मिळते.

तुम्ही कोणत्याहि शिक्षण संस्थेमध्ये कमला असले तरीसुद्धा कर्जासाठी अर्ज करू शकता. तुमचं वय २१-७० यादरम्यान असेल तर तुम्ही सहज रित्या अर्ज करू शकणार आहात, तुम्ही जर कंपनीत किंवा ज्या संस्थेमध्ये कामाला आहात त्यामध्ये तुमचं कमीत कमी एक वर्ष होन सुद्धा आवश्यक आहे तरच तुम्हालाही बँक कर्ज देऊ करतो.

कमीत कमी 24 हजार कर्ज

24 हजाराचे कमीत कमी कर्ज तुम्हाला ही बँक देते आणि जास्तीत जास्त २० लाखापर्यंत पर्यंत बँक State Bank Personal Loan तुम्हाला कर्ज देते, हे कर्ज तुमच्या पगाराच्या 24 पट एवढे असू शकते, तुम्हाला जर हे कर्ज घ्यायचे असेल तर त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती घेऊ शकता.

तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुमची पात्रता चेक करू शकता यामध्ये तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून दीड टक्के एवढी रक्कम द्यावी लागते हि तुमच्या कर्जाच्या रकमेमधून कापली जाते, जास्तीत जास्त 1000-15000 पर्यंत ही बँक प्रक्रिया शुल्क आकारते.

तुम्ही वेळेवर हप्ते नाही भरले तर याच्या दोन टक्के दर महिन्याला पेनल्टी चार्जेस लावले जातील, ओव्हरड्युई अमाऊंट वर तुम्हाला 2 दोन टक्के चार्जेस भरायला लागतत्.

प्रीपेमेंट साठी तीन टक्के एवढे चार्जेस बँक आकारणार असते त्यामुळे कोणतेहि लोन क्लास जर करायचे असेल तर अगोदर एकदा बँकेला विचारून घ्या, कमीत कमी 6 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त 72 महिन्यात तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता, जेवढ्या कमी वेळात कर्ज तुम्हाला फेडता येईल ते पाहायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे (State Bank Personal Loan)

हे कर्ज घेते वेळेस तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली आहे ती कागदपत्र तुम्हाला बँकेला द्यावे लागतील हे कागदपत्रे तुम्ही हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट करून सुद्धा देऊ शकता.

त्यामध्ये तुमचा आयकर रिटर्न, मागच्या सहा महिन्याचं बँक अकाउंट चे स्टेटमेंट, दोन पासपोर्ट साईज चे फोटो, चालू/मागील महिन्याचे पगार पत्रक, ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा तुम्हाला सादर करायचा असतो.

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळचं कोणत्याही शाखेमध्ये जाऊन या करता विचारणा करू शकता तसेच खालील दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन कर्ज सुद्धा घेऊ शकता तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे वैयक्तिक कर्ज  State Bank Personal Loan इच्छुक असाल तर आत्ताच खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन लगेच अर्ज सादर करू शकता.

स्टेट बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी : https://onlineapply.sbi.co.in/personal-banking/personal-loan

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *