State Bank Of India Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सर्वांच्या ओळखीची बँक या बँकेच्या संपूर्ण भारतभर सर्वाधिक शाखेसह कार्यरत आहे, या बँकेअंतर्गत चालू खाता, बचत खाता, एटीएम कार्ड, इन्शुरन्स, म्युचल फंड, सेक्युरिटी, सॅलरी अकाउंट या व्यतिरिक्त विविध कर्जाचा सुद्धा पुरवठा केला जातो.
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण भारतभरात आणि भारताच्या बाहेर सुद्धा कार्यरत आहे. एसबीआय अंतर्गत विविध प्रकारच्या कर्जाचा फायदा सर्वसामान्य नागरिक घेऊ शकतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया खूप कमी व्याजदरात कर्जाचा पुरवठा करते.
गृह कर्ज, मुद्रा लोन, सोनेतारण कर्ज, वाहन कर्ज, पेन्शन कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी सर्व प्रकारच्या कर्जासाठी (State Bank Of India Loan) तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती सुद्धा पाहू शकता, या बँकेमार्फत मिळणारे विविध कर्ज आणि त्या व्यक्तीची सविस्तर माहिती खाली दिलेल्या आहे महत्त्वाच्या काही कर्जाचा यामध्ये समावेश आहे.
गृह कर्ज (SBI Home Loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य नागरिकांसाठी, आपल्या ग्राहकांसाठी आणि दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल किंवा दुसऱ्या बँकेचा गृह कर्ज असेल ते गृह कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी अगदी उपयुक्त बँक आहे. या बँकेचा व्याजदर 8.30% पासून चालू होतो विविध चार ते पाच योजनेअंतर्गत ही बँक गृहकर्जाचा पुरवठा करते.
एसबीआय रेगुलर होम लोन, एसबीआय बॅलन्स ट्रान्सफर होम लोन, एसबीआय NRI होम लोन, एसबीआय फ्लेक्सि पे होम लोन, एसबीआय प्रिव्हिलेज होम लोन अंतर्गत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्जाचा फायदा घेऊ शकता. तुमचं वय कमीत कमी 18 वर्षे आणि तुम्ही भारतात राहत असाल तर हे गृह कर्ज सहजरित्या तुम्हाला उपलब्ध होऊ शकता.
ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता काय काय कागदपत्र लागतील आणि कशा पद्धतीने लोनचे प्रक्रिया पूर्ण होईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर मिळणार आहे. तीस लाखापर्यंत लोन बँक सर्वसामान्यांना देते.
मुद्रा लोन (State Bank Mudra Loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रधानमंत्री योजना अंतर्गत चालवले जाणारे मुद्रा योजनेमध्ये (State Bank Of India Loan) सुद्धा कार्य करते कमीत कमी एक लाख रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत कर्ज हे मुद्रा योजना अंतर्गत व्यवसायांसाठी दिले जात, या कर्जासाठी तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑनलाइन कर्ज तुम्हाला पन्नास हजार ते एक लाखापर्यंत मिळू शकते या कर्जासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी तुम्हाला लागू शकतो संपूर्ण माहिती बँकेच्या संकेतस्थळावर आणि मुद्रा लोन च्या एसबीआय च्या लिंक वर उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही याविषयीची माहिती घेऊ शकता, तुमच्या व्यवसायासाठी जर कर्जाची गरज असेल तर इथून तुम्ही कर्ज घेऊन व्यवसाय सुरळीत चालू शकतात
वाहन कर्ज (State Bank of India Loan – Vehicle Loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या विविध 10 योजना अंतर्गत वाहन घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देते नवीन कार घेण्यासाठी, जुनी कार घेण्यासाठी, गृह कर्ज खातेधारकांसाठी कार घेण्यासाठी, दुचाकी गाडी घेण्यासाठी, सुपर बाईक घेण्यासाठी, स्कुटी घेण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक कार घेण्यासाठी ही बँक कर्ज चा पुरवठा करते.
या बँकेचे व्याजदर चांगल्या प्रकारचे असून इलेक्ट्रॉनिक्स गाडी जर तुम्ही घेत असाल तर 100% सुद्धा तुम्हाला कर्जाचा पुरवठा येथे केल्या जातो. तुमचं नेट वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आसपास असेल तर तुम्ही या बँकेमधून कर्ज घेऊ शकता.
वैयक्तिक कर्ज (SBI Personal Loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या गरजेच्या काळामध्ये उपयुक्त पडणारे कर्ज वेगवेगळ्या नऊ योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते यामध्ये एक्सप्रेस म्हणून ओव्हरड्राफ्ट ची फॅसिलिटी पगारदार वर्गांना देते तर एसबीआय पेन्शन लोन अंतर्गत पेन्शनर साठी वैयक्तिक कर्ज चा पर्याय उपलब्ध करून देते.
एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत पगारदार वर्गांना एसबीआय वैयक्तिक कर्ज (State Bank Of India Loan) ऑप्शन देते प्रे अपलोड पर्सनल लोन इन फोर क्लिक मध्ये हे एक ऑप्शन सुद्धा एसबीआय प्रोव्हाइड करते.
लोन अगेन्स्ट सेक्युरिटी, एसबीआय क्विक पर्सनल लोन, एसबीआय एक्सप्रेस इलाईट, रियल टाईम एक्सप्रेस क्रेडिट या अंतर्गत डिफेन्स गव्हर्मेंट आणि कस्टमर साठी स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जाचा पुरवठा करते.
शैक्षणिक कर्ज (State Bank of India Loan – Education Loan)
स्टेट बँक ऑफ इंडिया विविध 12 योजना अंतर्गत शिक्षणासाठी कर्जाचा पुरवठा करते, 8.15 टक्के पासून या कर्जाचा व्याजदर चालू होतं या कर्जामध्ये एसबीआय स्टुडन्ट लोन,स्कॉलर लोन, स्टडीज स्किल लोन टेकओव्हर ऑफ एज्युकेशन लोन, डॉक्टर आंबेडकर इंटरेस्ट सबसिडी स्कीम, पढो प्रदेश स्कीम, सबसिडी स्कीम, सीएसआयएस स्कीम, एज्युकेशन लोन फॉर एम आय टी सी, एज्युकेशन लोन या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते, कमीत कमी व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्ज स्टेट बँक मार्फत दिले जाते.
कंजूमर ड्युरेबल लोन (SBI Consumer Durable Loan)
कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा आपल्याला घरी लागणार असे कोणत्याही सामान असो, आपण दुकानावर गेल्यानंतर जास्त महागडा असेल तर घेण्यासाठी टाळाटाळ करतो यावर उपाय म्हणून दुकानदार कंजूमर ड्युरेबल लोनचा पर्याय आपल्यासमोर ठेवतात.
परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया चांगल्या व्याजदरावर तुम्हाला हे कर्ज (State Bank Of India Loan) उपलब्ध करून देते काही ठिकाणी यासाठी कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की कॅम्पुटर, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन घेण्यासाठी सुद्धा बँक कर्जाचा पुरवठा करते.
तीन हजारापासून दोन लाखापर्यंत हे बँक कर्ज देते तीन महिन्यापासून 36 महिन्यांमध्ये हे कर्ज तुम्हाला फेडायचे असते, कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंटेशनची किटकिट यामध्ये नाही काही मिनिटांमध्ये तुम्हाला कंजूमर ड्युरेबल लोन अप्रूव्ह करून बँक तुमच्या अकाउंटला जमा करते.
वर नमूद केलेले बँकेचे महत्त्वाचे कर्ज असून या व्यतिरिक्त भरपूर योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जाचा पुरवठा करते स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज घ्यायचे असेल तर त्यांची अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/ वर जाऊन तुम्ही ऑनलाइन तसेच बँकेच्या शाखेला भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.