Punjab & Sind Bank Loan

Punjab Sind Bank Loan : 1908 मध्ये तीन जणांनी मिळून सुरू केलेली पंजाब अँड सिंध बँक आज भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा कार्यरत आहे या बँकेमार्फत विविध प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या बँकेमार्फत विविध प्रोडक्स वितरित केले जातात.

या बँकेमार्फत बचत खाते, चालू खाते, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, विविध प्रकारचे कर्ज जसे की गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादी कर्जाचा पुरवठा सुद्धा केला जातो.

व्यवसायासाठी या बँकेमार्फत मुद्रा लोन सुद्धा वितरित केले जाते बँकांची फॅसिलिटी संपूर्ण भारतभर अवेलेबल आहे ही बँक राष्ट्रीयकृत बँक असून या बँकेचे टर्नओव्हर सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे. या बँकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा व्यतिरिक्त कृषी क्षेत्रासाठी आणि इन्शुरन्स साठी वेगवेगळे पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

या बँकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या इतर सुविधा व्यतिरिक्त कर्जाची सुविधा सुद्धा दिले जाते या कर्जामध्ये वैयक्तिक कर्ज, कृषी कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, सोनेतारण कर्ज, किसान क्रेडिट कार्ड याचा समावेश होतो या सर्व कर्जाविषयी सविस्तर तपशील तुम्ही खालील पद्धतीने पाहू शकता

या बँकेमार्फत 4 प्रकारचे कर्ज ऑनलाईन पद्धतीने केले जाते.

डिजिटल गृह कर्ज (PSB Digital Home Loan)

पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत 8.45 टक्के एवढे कमी व्याजदरावर घर घेण्यासाठी जवळपास 90% पर्यंत कर्ज दिले जात, कोणतेही प्रक्रिया शुल्क ही बँका करत नाही इन्स्पेक्शनचे चार्जेस सुद्धा ही बँक घेत नाही. जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत हे कर्ज तुम्ही फेडू शकता या सर्व परतफेडच्या कालावधीमध्ये तुम्हाला तीन ईएमआय कमी केले जातात.

जर तुम्ही हे कर्ज व्यवस्थित रित्या फेडले तर होम लोन साठी पंजाब अँड सिंध बॅंकेकडे हा चांगला पर्याय उपलब्ध आहे, सर्वसामान्यांसाठी सुद्धा हे कर्ज अत्यंत उपयोगाचा असणार आहे.

वाहन कर्ज (Punjab Sind Bank Loan – Vehicle Loan)

पंजाब अँड सिंध बँकेमार्फत जास्तीत जास्त 30 मिनिटांमध्ये वाहन घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते, कोणते प्रे पेमेंट किंवा इन्स्पेक्शन चार्जेस न घेता पंजाब अँड सिंध बँक जलद गतीने वाहन कर्ज देते. व्याजदर 8.60% पासून सुरु होतो तर तुमच्या व्यावहारिक घडामोडीनुसार या बँकेचा व्याजदरामध्ये विविधता आढळून येते.

प्रक्रिया शुल्क मध्ये 50% सूट बँकेमार्फत दिलेली आहे त्यासाठी काही अटी आणि नियम दिलेले आहेत (Punjab Sind Bank Loan) ते तुम्ही अर्ज करते वेळेस पाहू शकता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सहजरीत्या तुम्ही करू शकणार आहात अर्ज केल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांमध्ये हे पैसे संबंधितच्या अकाउंटला जमा होतं.

वैयक्तिक कर्ज (Punjab & Sind Bank Personal Loan)

पंजाब अँड सिंध बँके अंतर्गत जास्तीत जास्त 72 महिन्यासाठी वैयक्तिक कर्जाचा पुरवठा केला जातो जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत हे कर्ज तुम्हाला मिळते हे कर्ज (Punjab Sind Bank Loan) सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त 30 मिनिटात घेऊ शकता. गरजेच्या वेळेस जलद गतीने उपलब्ध होणार आहे, अत्यंत उपयोगी पडणार आहे, हे कर्ज चांगल्या व्याजदरवर तुम्हाला पंजाब अँड सिंध देऊ करते.

डिजिटल मुद्रा लोन (PSB Mudra Digital Loan)

व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारमार्फत चालवले जाणार मुद्रा लोन कमी व्याजदरामध्ये पंजाब अँड सिंध बँक तुम्हाला देते. 9.45% एवढे व्याजदरापासून ही बँक मुद्रा लोन देत असून यासाठी जास्तीत जास्त 60 महिन्यापर्यंत रिपेमेंट पिरेड अवेलेबल आहे.

हे कर्ज तुम्ही 30 मिनिटाच्या आत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळवू शकता यासाठी कोणतेही प्रे पेमेंट /चार्जेस नाहीयेत. दहा लाखापर्यंत तुम्ही हे कर्ज पंजाब अँड सिंध बँकेतून घेऊ शकता. व्यवसाय वृद्धीसाठी या कर्जाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्ही या कर्जासाठी जर इच्छुक असाल तर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ये कर्ज घेऊ शकता.

एमएसएमई लोन (PSB MSME Loan )

व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी एक पर्याय पंजाब आणि सिंध बँकेमार्फत दिला जातो तो म्हणजे पंजाब अँड सिंध बँक MSME लोन या कर्जाचा व्याजदर 9% पासून सुरू होतो वर्किंग कॅपिटल साठी म्हणजे मशीन घेण्यासाठी, प्लांट खरेदी करण्यासाठी किंवा इतर वर्किंग कॅपिटल साठी तुम्ही या कर्जाचा उपयोग करू शकता डिजिटली अप्रोवल होणार आणि जास्तीत जास्त पाच करोड पर्यंत मिळणार हे लोन तुम्ही फक्त तीस मिनिटांमध्ये घेऊ शकणार आहात.

तीस मिनिटाच्या आत या कर्जाचा अप्रोवल तुम्हाला मिळतं सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यानंतर ते कर्ज (Punjab Sind Bank Loan) तुम्ही सहजरीत्या तुमच्या खात्यामध्ये घेऊ शकता. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्हाला व्यवसाय मध्ये आणखी गुंतवणूक करायची असेल मशीनरी घ्यायच्या असतील तर या कर्जाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वर दिलेली सर्व कर्ज ऑनलाईन पद्धतीने पंजाब अँड सिंध बॅंकेकडून दिले जातात तुम्ही जर इच्छुक असाल आणि कर्ज यापैकी कोणतेही कर्ज घेण्याची तुमची इच्छा असेल किंवा गरज असेल तर पंजाब अँड सिंध बँकेचे अधिकृत वेबसाईट https://punjabandsindbank.co.in/ वर जाऊन डिजिटल लोन या पर्यायांमध्ये तुम्ही या सर्व लोन विषयीची माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *