Punjab National Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Punjab National Bank Loan : पंजाब नॅशनल बँक भारतातली पहिली स्वदेशी बँक आहे या बँकेची स्थापना 12 एप्रिल 1895 मध्ये आत्ता पाकिस्तान मध्ये असलेल्या लाहोर येथे झालेली होती. दोन लाख रुपये कॅपिटल आणि वीस हजार रुपये वर्किंग कॅपिटलचा ही बँक 1895 मध्ये सुरू झाली.

त्यानंतर वेगवेगळ्या नऊ बँक या बँकेमध्ये मर्ज झाल्यात आणि आज एक तगडी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेकडे बघितल्या जाते. पंजाब नॅशनल बँक ग्रामीण, शहरी आणि मेट्रोपोलीसन भागामध्ये उपलब्ध असून ही बँक 10 हजार 927 शाखेसह भारतभर कार्यरत आहे या सहित दोन आंतरराष्ट्रीय शाखा सुद्धा या बँकेच्या आहेत.

संपूर्ण भारतभर या बँकेचे 12645 एटीएम आहेत. आणि या बँकेचे 28 हजार 782 सहकारी संस्था संपूर्ण भारतभर कार्यरत आहे, 2023 च्या आर्थिक वर्षांमध्ये 03 हजार 12 कोटीचा नफा असणारे हे बँक भारतभर विविध सुविधा पुरवते. यामध्ये चालू खाते, बचत खाते, सोबतच फिक्स डिपॉझिट, एटीएम कार्ड या सुविधा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना देते.

इन्शुरन्स मध्ये सुद्धा ही बँक कार्यरत असून पीएनबी मेटलाइफ या नावाने या बँकेच्या विविध विमा कार्ये चालते भारत सरकार चालवत असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना, PMGBY, प्रधानमंत्री सोशल सेक्युरिटी योजना या योजनेअंतर्गत सुद्धा ही बँक कार्य करते. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत सुद्धा पंजाब नॅशनल बँक विविध वयाच्या व्यवसायांना कर्जाचा पुरवठा करते.

ही बँक विविध प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना देते यामध्ये प्रचलित असणाऱ्या (Punjab National Bank Loan) गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज चा समावेश होतो. या व्यतिरिक्त ही बँक व्यवसायासाठी एमएसएमई लोन, मुद्रा लोन हे सुद्धा देते तसेच शेतकरी वर्गांसाठी एग्रीकल्चर लोन, डिजिटल ऍग्रीकल्चर लोन सुद्धा प्रोव्हाइड करतात.

किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री फसल विमा योजना सबसिडी यामध्ये सुद्धा ही बँक कार्य करते. या बँकेमार्फत दिल्या जाणारे महत्त्वाचे काही कर्जाचे सविस्तर माहिती खाली दिलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना या गोष्टीची माहिती असणे गरजेची आहे खाली दिलेली माहिती थोडक्यात असली तरी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता.

गृह कर्ज (PNB Home Loan)

पंजाब नॅशनल बँक विविध प्रकारच्या पाच कर्ज योजनेअंतर्गत गृह कर्जाचा पुरवठा करते यामध्ये पीएनबी मॅक्स, पीएनबी प्राईड हौसिंग लोन फोर पब्लिक, प्रधानमंत्री आवास योजना, पीएनबी नेक्स्ट जेन चा समावेश आहे. पगारदार वर्गासाठी ही बँक नवीन घर घेण्यासाठी, नवीन घर बांधण्यासाठी कर्जाचा पुरवठा करते.

तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल तर कमीत कमी तीन वर्षे चा अनुभव तुमच्याकडे असण गरजेचा आहे, तुमचं वय जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता, कमीत कमी महिन्याला 35 हजार रुपये तुमची सॅलरी असणार गरजेचा आहे आणि ही सॅलरी नेट मंथली सॅलरी असावे.

ज्या मधून तुमचं डिडक्शन होऊन सॅलरी येते ती सॅलरी तुम्ही नेट सॅलरी म्हणून (Punjab National Bank Loan) गृहीत धरतात बँकेच्या व्याजदराविषयी सविस्तर माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, पण कमीत कमी 8.30% पासून या बँकेचा व्याजदर चालू होता प्रोसेसिंग फी व इतर चार्जेस बँक लावत असून त्याचे माहिती सुद्धा तुम्ही संबंधित संकेतस्थळावरून पाहू शकता.

वैयक्तिक कर्ज (Punjab National Bank Personal Loan)

पंजाब नॅशनल बँक विविध सहा योजना अंतर्गत वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते यामध्ये पर्सनल लोन स्कीम फॉर एलआयसी इंडिया एम्प्लॉयी, पर्सनल लोन स्कीम फॉर पब्लिक, पर्सनल लोन स्कीम फॉर डॉक्टर, पर्सनल लोन स्कीम फॉर पेन्शनर, पीएनबी बागबान आणि सोनेतारण कर्ज अंतर्गत हे बँक आर्थिक सहाय्य करते, वैयक्तिक कर्जाचा व्याजदर सुद्धा इतर बँकापेक्षा चांगला असल्यामुळे यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

वाहन कर्ज (Punjab National Bank Loan – Vehicle Loan)

इलेक्ट्रॉनिक गाड्या आल्यानंतर भारत सरकार सुद्धा सबसिडी देताना विविध बँका सुद्धा यासाठी लोन मध्ये कन्सेशन देत असतात बँकेमार्फत पीएनबी ग्रीन कार लोन हे इलेक्ट्रिक गाडीसाठी दिला जाणारा कर्ज आहे या सोबतच इतर गाड्यांसाठी तुम्ही इन्स्टा वेहिकल लोन आणि पीएनबी कॉम्बो लोन मध्ये तुम्ही होम लोन आणि कार लोन हे दोन्ही पर्याय निवडू शकता.

पीएनबी प्राईड कार लोन मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बँक कर्जाचा पुरवठा करते तर दुचाकी गाडी घेण्यासाठी सुद्धा ही बँक कर्जाचा पुरवठा करते. पीएनबी पावर राईट अंतर्गत महिलांसाठी चांगल्या व्याज दारावर पंजाब नॅशनल बँक कर्जाचा पुरवठा करते.

शैक्षणिक कर्ज (PNB Education Loan)

देशांमध्ये अथवा देशाच्या बाहेर शिक्षणासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी आपल्याला कर्ज (Punjab National Bank Loan) काढावे लागते पंजाब नॅशनल बँकेअंतर्गत विविध 12 योजना अंतर्गत शैक्षणिक कर्ज पुरवठा केला जातो, यामध्ये जेवढा शिक्षणासाठी खर्च होतो तेवढा खर्च बँकेमार्फत दिला जातो.

शैक्षणिक कर्ज मध्ये पीएनबी सरस्वती, पीएनबी प्रतिभा, पीएनबी उडान, पीएनबी कौशल, पीएनबी प्रवासी शिक्षण, पीएनबी पीएम केअर्स, पीएनबी पढो प्रदेश,क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर एज्युकेशन लोन, क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर स्किल डेव्हलपमेंट इत्यादी योजनेचा समावेश आहे.

वर दिलेल्या सर्व कर्जासाठी (Punjab National Bank Loan) तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता जर तुम्ही इच्छुक असेल आणि तुम्हाला वर दिल्यापैकी कोणते कर्जाची आवश्यकता असेल तर पंजाब नॅशनल बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pnbindia.in/ वर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या कोणत्या शाखेमध्ये जाऊन कर्ज विषयीची चौकशी करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *