Kotak Mahindra Loan

Kotak Mahindra Loan : कोटक महिंद्रा बँक आपण सर्वांनी हे नाव कधीतरी ऐकले असेल आणि या बँकेच्या हजारो शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत, विविध प्रकारच्या सुविधा ही बँक सर्वसामान्य नागरिकांना देते. कोटक महिंद्रा बँकेचे 811 हे ऑनलाईन खाते सर्वांना माहीतच आहे.

कोटक महिंद्रा बँक 811 झिरो बॅलन्स अकाउंट विविध प्रकारचे बचत खाते तसेच विविध प्रकारचे चालू खाते सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना काढण्याचा सुविधा देते,कोटक महिंद्रा बँकेमध्ये तुम्ही सॅलरी अकाउंट सुद्धा काढू शकतात. विविध पाच ते सहा प्रकारचे सॅलरी अकाउंट्‍स कोटक महिंद्रा बँक मार्फत काढले जाऊ शकते.

कोटक महिंद्रा बँक विविध प्रकारच्या फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, टॅक्स सेविंग फिक्स डिपॉझिट मध्ये सुद्धा कार्य करते, या बँकेचे विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड सुद्धा आहेत, डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि इतर कार्ड च्या सुविधा सुद्धा ती बँक सर्वसामान्य नागरिकांना देते.

कोटक महिंद्रा बँकेअंतर्गत तुम्ही म्युचल फंड, स्टॉक्स, नॅशनल पेन्शन सिस्टीम, जीवन विमा, टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, कार विमा, दुचाकी विमा व इतर सरकारी योजनेअंतर्गत इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करू शकता. या बँकेअंतर्गत या सर्व सुविधे व्यतिरिक्त विविध प्रकारचे कर्ज (Kotak Mahindra Loan) सुद्धा ही बँक सर्वसामान्यांना देऊ करते.

वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यावसायिक कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, इन्स्टंट पर्सनल लोन यासारख्या अति जलद गतीने मिळणारे कर्ज सुद्धा ही बँक देते. या बँकेमध्ये प्रमुख पाच कर्जाविषयीचे सविस्तर माहिती आपण बघुयात त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता हे सुद्धा आपण खाली पाहुयात.

वैयक्तिक कर्ज (Kotak Mahindra Bank Personal Loan)

घराच्या पुनर्भरणा करण्यासाठी, लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर वैयक्तिक गोष्टीसाठी आपल्याला पर्सनल लोन घेण्याची कधीतरी गरज पडते, कोणतीही तारण न ठेवता तुम्ही कोटक महिंद्रा बँकेतून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, 40 लाखापर्यंत कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्ज देते.

या कर्जाचा परतावा तुम्ही एक वर्ष ते सहा वर्षाच्या दरम्यान करू शकता याचा व्याजदर 10.99% पासून चालू होतो, हे सर्व कर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून तुम्ही घेऊ शकता डिजिटल KYC अंतर्गत OTP बेस्ड कर्ज कोटक महिंद्रा बँक देते. इन्स्टंट लोन मध्ये तुम्ही पाच लाखापर्यंत अति जलद गतीने लोन घेऊ शकता.

यामध्ये अप्लिकेशन भरायच आहे, ऑफर चेक करायची आहे आणि पर्सनल लोन तुम्हाला घ्यायच आहे, या व्यतिरिक्त कोटक महिंद्रा बँक आणखी विविध प्रकारच्या पर्सनल लोनच्या ऑफर्स तुम्हाला देऊ करते, संपूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सहजरीत्या पाहू शकता.

गृह कर्ज (Kotak Mahindra Loan – Home Loan)

कोटक महिंद्रा बँक अंतर्गत नवीन घर घेण्यासाठी, घराच्या रिनोव्हेशनसाठी व घरातील इतर खर्चासाठी गृह कर्ज दिल्या जाते. आकर्षक व्याजदरावर कमीत कमी कागदपत्रांमध्ये ही बँक गृह कर्जाचा पुरवठा करते. 25 वर्षांमध्ये त्यांचं गृह कर्ज (Kotak Mahindra Loan) तुम्हाला परतफेड करायचे असते, तुम्ही कोटक महिंद्रा बँकेकडून गृह कर्ज घेऊ इच्छित असाल तर प्रक्रिया शुल्कावर 50% पर्यंत तुम्हाला फायदा मिळू शकतो.

हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही जर पगारदार वर्गातून येत असाल तर सहजरित्या तुम्हाला लोन उपलब्ध होऊ शकते, यासाठी 18 ते 60 वर्ष वय असणारे कोणतीही नागरिक कर्ज घेऊ शकतात, कमीत कमी 20 हजार रुपये दर महिना पगार गरजेचा आहे यासोबतच तुमच्याकडे कोणतीतरी बॅचलर डिग्री असेल आणि तुम्ही सरकारी/खाजगी कंपनीमध्ये काम करत असाल तर सहजरीत्या तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते.

या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन या अर्जाची प्रक्रिया तुम्ही पार पाडू शकता.

शैक्षणिक कर्ज (Kotak Mahindra Education Loan)

कोटक महिंद्रा बँक मध्ये विविध प्रकारचे कर्ज दिले जातात यामध्ये शैक्षणिक कर्जाचा सुद्धा समावेश होतो भारतात किंवा भारताबाहेर तुम्हाला शिकायला जायचं असेल तर कोटक महिंद्रा बँकेचे असलेल्या यादीमधून तुम्ही शिक्षण घेत असाल तर कोटक महिंद्रा बँक तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा करते.

जर तुम्ही भारतामध्ये शिक्षण घेत असेल तर आधी जलद गतीने कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला या कर्जाच अप्रूव्हल मिळतं, भारताच्या बाहेर जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर वीस लाखापर्यंत तुम्हाला कर्जाचा पुरवठा केला जातो, भारतामध्ये विविध कोर्सेस साठी हे बँक कर्ज पुरवते यामध्ये मेडिकल, एग्रीकल्चर, इंजीनियरिंग, सीएसएस किंवा इतर कोर्सेस तुम्ही करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते.

या कर्जासाठी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेणार आहात युजीसी, गव्हर्मेंट किंवा नोंदणीकृत कॉलेज असण गरजेच आहे. भारताबाहेर तुम्ही एमसीए, एमबीए, एमएस जर करत असाल तर त्यासाठी सुद्धा कोटक महिंद्रा बँक कर्ज देते. वीस लाखापर्यंत कर्ज भारताबाहेर शिक्षणासाठी तुम्हाला कोटक महिंद्रा बँक देऊ शकते 9.2% व्याजदर तुम्हाला लागू शकतो.

हा व्याजदर तुमच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असेल या बँकेच्या इतर चार्जेस विषयी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचे संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

सोनेतारण कर्ज (Kotak Mahindra Loan – Gold Loan)

कोटक महिंद्रा बँक सोनेतारण कर्ज अत्यंत जलद गतीने देते तुमच्या सोन्याची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेणारी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, कमीत कमी कागदपत्रे,जास्तीत जास्त तुमच्या सोन्यावर कर्ज (Kotak Mahindra Loan) देणारी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेतून तुम्ही सोनेतारण कर्ज घेत असाल तर 8 टक्के ते 24 टक्के एवढी व्याजदर तुम्हाला लागते.

दोन पासपोर्ट फोटो, पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि सोने ठेवल्यानंतर ही बँक जलद गतीने तुम्हाला पैसे देते इतर कोणत्याही गोष्टी न देता तुम्ही फक्त सोने तारण ठेवल्यानंतर तुम्हाला कर्जाचा पुरवठा होतो. यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 75 वर्ष असणं गरजेचं आहे.तुम्ही जास्तीत जास्त 24 कॅरेट चा सोनं 50 ग्रॅम पर्यंत बँकेमध्ये ठेवून गोल्ड लोन घेऊ शकता.

कार लोन (Kotak Mahindra Loan – Car Loan)

चार चाकी घेण्याचा प्रत्येक जणांचं स्वप्न असतं गरजेच्या वेळेला चार चाकी सर्वात उपयोगी पडणारे साधन आहे, कोटक महिंद्रा बँक कारच्या ऑन रोड प्राईस वर 100% फंडिंग करते. कोटक महिंद्रा बँकेचे कार लोन तुम्ही घेऊ इच्छित असाल तर वेगवेगळ्या कार्स वर कोटक महिंद्रा बँक आकर्षक व्याजदरावर कर्ज देते.

अत्यंत जलद प्रोसेसने हे कर्ज तुम्हाला मिळू शकते, या कर्जाचा (Kotak Mahindra Loan) परतफेडीचा कालावधी सात वर्ष एवढा आहे. भारतातील कोणताही नागरिक कार लोन घेऊ शकतो त्यासाठी कमीत कमी 15000 एवढं मासिक उत्पन्न असेल तरी कर्ज मिळू शकतो. कमीत कमी मागचा एक वर्ष तुम्ही त्या कंपनीमध्ये कामाला असायला हव आणि तुमचं वय कमीत कमी 21 वर्षे असणे गरजेचे आहे.

हे कर्ज घेते वेळेस तुम्हाला विविध प्रकारचे कागदपत्र बँके कडे द्यायला लागतात त्यामध्ये तुमच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड,सॅलरी स्लीप, फॉर्म 16 किंवा आयटी रिटर्न चे डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं असतं.

व्यावसायिक लोन (Kotak Mahindra Business Loan)

ही बँक सर्वसामान्य नागरिकांना ज्या प्रकारे कर्जाचा पुरवठा करते त्याचप्रमाणे व्यवसायासाठी सुद्धा ही बँक कर्जाचा पुरवठा करते तीन लाखापासून 40 लाखापर्यंत कर्ज कोणत्याही तारण न घेता ही बँक देते. अत्यंत हसल फ्री आणि जलद गतीने पास होणार कर्ज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरू शकता.

जास्तीत जास्त 60 लाखापर्यंत हे बँक व्यावसायिकांना कर्ज देते हे कर्ज (Kotak Mahindra Loan) तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल केल्यानंतर काही वेळामध्ये तुमच्या घरी येऊन कर्जाची पूर्ण प्रोसेस बँके मार्फत केली जाते, व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. मागच्या तीन वर्षापासून तुम्ही व्यवसाय करत असणे आवश्यक आहे आणि वर्षाला कमीत कमी 40 लाख एवढा तुमचा टर्नओव्हर असणं गरजेचं आहे.

प्रोप्रायटरशिप, पार्टनर्सशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एलएलपी या बँकेमधून कर्ज घेऊ शकतात जास्तीत जास्त दोन टक्क्यापर्यंत प्रक्रिया शुल्कही बँक आकारते कागदपत्र साठी वेगवेगळे शुल्कबँक आकारू शकते, एक लाखापासून तीन लाखापर्यंत इझी पेमेंट ऑप्शन आहे तुम्ही कर्ज घेऊ शकता.

वर नमूद केलेल्या सर्व कर्जाची (Kotak Mahindra Loan) माहिती कोटक महिंद्रा बँकेचा अधिकृत संकेतस्थळ https://www.kotak.com/ वर जाऊन तुम्ही पाहू शकता. कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर लोन्स या सेक्शन मध्ये जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *