Karur Vysya Bank Loan : 107 वर्ष जुनी असलेल्या करूर वैश्य बँकेची स्थापना 1916 मध्ये केरळ येथे करण्यात आली कृषी क्षेत्रातील बॅकग्राऊंड असलेल्या श्री वेंकटरमण चेत्तीय्यर आणि आणि श्री अथी कृष्ण चेत्तीय्यर यांनी 1916 मध्ये या बँकेची स्थापना केली एक लाख वीस हजार एवढ्या कॅपिटल मध्ये या बँकेची स्थापना केली.
या बँकेचे आज रोजी निव्वळ नफा बघितला तर 1106 कोटी एवढा आहे, ही बँक 799 शाखे सह आणि 2206 एटीएमसह संपूर्ण भारतभरात कार्यरत आहे. या बँकेचे 15 बँकिंग युनिट्स आहेत व 9 कार्पोरेट बिजनेस युनिट्स आहेत या बँका अंतर्गत विविध सुविधा दिल्या जातात.
ज्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, गिफ्ट कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फॉरेक्स ट्रॅव्हल्स, कार कर्ज, POS मशीन, फास्ट टॅग, बीबीपीएस यासारख्या सुविधा तुम्हाला या बँके अंतर्गत मिळू शकतात, या बँके मध्ये तुम्ही चालू तसेच बचत खाते उघडू शकता, त्याचप्रमाणे रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
ही बँक लॉकर फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला देते यासोबतच विविध प्रकारचा विमा, म्युचल फंड्स व इतर गुंतवणुकीच्या पर्यायावर सुद्धा काम करते, हे बँक सरकारी योजनांमध्ये नॅशनल पेन्शन सिस्टीम, पी एम ए वाय एस जी बी तसेच अटल पेन्शन योजना, पी एम एस बी वाय बी एम, जे जे बी वाय या अंतर्गत सुद्धा कार्य करते.
या सर्व व्यतिरिक्त ही बँक विविध प्रकारचे कर्ज (Karur Vysya Bank Loan) सर्वसामान्य नागरिकांना देते त्यामध्ये वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज व इतर वैयक्तिक कर्जाचा समावेश आहे. या बँके अंतर्गत देण्यात येणारा मुख्यतः पाच विविध प्रकारच्या कर्जाचे सविस्तर माहिती आपण खाली बघुयात ते कर्ज कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता.
वैयक्तिक कर्ज (KVB Personal Loan)
स्वतःच्या विविध गरजा भागवण्यासाठी माणसाला पैशाची आवश्यकता दैनंदिन जीवनात नेहमीच पैशाची गरज पडत असते अशा वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचा विचार करतो.
काहीजण सावकारी कर्ज काढतात तर काहीजण बँकेमार्फत कर्ज घेतात KVB म्हणजे करून वैश्य बँक तुम्हाला चांगल्या प्रकारचे कमीत कमी व्याजदर असल्याने कमीत कमी वेळ खाऊ प्रोसेस असणारे वैयक्तिक कर्ज सहजरीत्या देते.
यामध्ये कागदपत्रासाठी कोणतेही चार्जेस नाहीत आणि कोणतीही सेक्युरिटी तुम्हाला बँके कडे गहाण ठेवायचं नाही, जास्तीत जास्त 72 महिन्यांमध्ये हे कर्जाची परतफेड तुम्ही करू शकता, जर तुम्हाला हे कर्ज (Karur Vysya Bank Loan) घ्यायचा असेल तर तुम्ही एकाच कंपनीत कमीत कमी एक वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता.
72 महिन्याच्या ईएमआय वर प्रक्रिया शुल्क 0.50% एवढे लावले जाते कमीत कमी 1000 व जीएसटी एवढे प्रक्रिया शुल्क बँक आकारते कागदपत्रासाठी कोणतेही शुल्क ही बँक आकारत नाही या बँकेचा व्याजदर तुमच्या क्रेडिट हिस्टरीनुसार/क्रेडिट स्कोर नुसार बदलत असतो,त्यामुळे जर व्यवस्थित संपूर्ण तुम्हाला व्याजदर पाहायचा असेल तर बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन एकदा चेक करू शकता.
गृह कर्ज (Karur Vysya Bank Home Loan)
करूर वैश्य बँक भारतामधील नागरिकांना तसेच भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा गृह कर्जाचा पुरवठा करते जर तुम्ही नवीन घर घेऊ इच्छित असाल, घर घेण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट तुमच्याकडे जमा असेल तर बँकेकडे गृह कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुमच्या सिबिल चांगला असेल तुमचं रेटिंग चांगला असेल तर पंधरा मिनिटांमध्ये सुद्धा ही बँक तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते.
तीस वर्षे एवढे बँकेचा परतावा कालावधी असून प्रे पेमेंट साठी कोणते चार्जेस बँक आकारत नाही सर्व भारतीय साठी हे लोन (Karur Vysya Bank Loan) उपलब्ध असून, नवीन घर घेण्यासाठी, घराच्या बांधकामासाठी, जागा घेण्यासाठी, दुसऱ्या बँकेचे लोन आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ही बँक या सुविधा सर्वसामान्यांना पुरवते.
ही बँक तुम्हाला घराच्या एकूण रकमेच्या 75% ते 90% एवढे कर्ज देते यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून ही बँक जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये पर्यंत रक्कम आकारते तुम्ही घेत असलेला प्लॉट, जागा किंवा फ्लॅट या बँकेकडे गहाण असतो जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडणार नाही तोपर्यंत.
या बँकेमध्ये जर तुम्ही कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला सहा महिन्याच्या बँकेचे स्टेटमेंट, मागच्या दोन वर्षाचा आयटी रिटर्न व मागच्या सहा महिन्याचे सॅलरी स्लिप तुम्हाला लागेल. प्रे पेमेंट साठी कोणतेही चार्जेस ही बँक आकारत नाही या बँकेचे व्याजदर 9.23% एवढे असून जास्तीत जास्त हे व्याजदर 10.73% पर्यंत तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार तुम्हाला मिळू शकते.
वाहन कर्ज (Karur Vysya Bank Loan – Vehicle Loan)
करूर वैश्य बँक दुचाकी किंवा चार चाकी घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कर्जाचा पुरवठा करते, चार चाकी घेण्याचे तुमचे स्वप्न असेल डाऊन पेमेंट कमीत कमी दहा ते वीस टक्के करायचे तयारी असेल तर करून पैसे बँकेमध्ये तुम्ही कर्जासाठी नक्कीच अर्ज करू शकता.
या बँकेमध्ये झिरो डाउन पेमेंट वर सुद्धा तुम्ही चार चाकी वाहन घेऊ शकता 100% ऑन रोड फंडिंग असल्यामुळे तुम्ही हे लोन सहजरीत्या घेऊ शकता, लोन (Karur Vysya Bank Loan) घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिस कॉल देण्याची आवश्यकता आहे. सात वर्ष एवढा रिपेमेंट कालावधी आहे.
कमीत कमी प्रक्रिया शुल्क असलेल्या करूर वैश्य बँकेचे लोन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असेल नवीन गाडीसाठी तुम्हाला कमीत कमी दहा टक्के एवढे डाऊन पेमेंट करायला लागेल, तर जुनी गाडी घेत असाल तर तुम्ही 40% पर्यंत डाऊन पेमेंट करू शकता सात वर्षांपर्यंत या कर्जाचा कालावधी असतो सात वर्षांमध्ये तुम्हाला हे कर्ज फेडायचे असते या कर्जाचा व्याजदर 9% पासून 12% पर्यंत आकारते.
शैक्षणिक कर्ज (Karur Vysya Bank Loan – Education Loan)
भारताबाहेर व भारतामध्ये शिक्षणासाठी ही बँक सबसिडी वर सुद्धा शैक्षणिक कर्ज देते करोड असे बँके अंतर्गत तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करत असाल तर कोणती मार्जिन न ठेवता 100% फंडिंग तुम्हाला मिळते, कोणतीही प्रक्रिया शुल्क ही बॅंका आकारत नाही.
पंधरा वर्षांमध्ये या कर्जाची परतफेड कालावधी असतो, भारतामध्ये शिकण्यासाठी प्रोफेशनल कोर्ससाठी किंवा टेक्निकल कोर्स साठी तुम्ही अर्ज करू शकता, यासाठी ही बँक भारतामध्ये जर शिक्षण घेत असेल तर एक कोटी रुपये आणि भारताच्या बाहेर शिक्षण घेत असाल तर दीड कोटी रुपयांपर्यंत रक्कम तुम्हाला देते.
चार लाखाच्या वर जर तुम्ही कर्ज घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी म्हणून एक गॅरेंटर द्यावा लागतो गॅरेंटर वडील किंवा कोणीही पालक असू शकतात, विद्या लक्ष्मी पोर्टल अंतर्गत हे शैक्षणिक कर्ज (Karur Vysya Bank Loan) तुम्हाला मिळू शकते या कर्जाचा व्याजदर 9.99% पासून जास्तीत जास्त 13.98% पर्यंत असतो, हे अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय 16 वर्ष ते 45 वर्षाचा दरम्यान असावा तसेच गॅरेंटर चे वय जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असाव.
वैयक्तिक कर्ज-इतर (Karur Vysya Bank Personal Loan)
हे बँक विविध योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते यासाठी 10 हजार रुपये एवढे प्रक्रिया शुल्क बँक आकारते सुरक्षित वैयक्तिक कर्ज देते, तुमचं सिबिल रेकॉर्ड पाहून तुम्हाला हे बँक कर्ज देते, जास्तीत जास्त दहा लाख रुपये पर्यंत हे कर्ज 180 महिन्यामध्ये तुम्ही याची परतफेड करू शकता.
यासाठी 0.50% ते 1% पर्यंत ही बँक प्रक्रिया शुल्क आकारते जास्तीत जास्त पंधरा मिनिटांमध्ये हे कर्ज (Karur Vysya Bank Loan) तुम्ही घेऊ शकता भारतामध्ये न राहणारे सुद्धा या कर्जासाठी पात्र असू शकतात, जास्तीत जास्त दहा लाख रुपये कर्ज तुम्ही या बँके अंतर्गत घेऊ शकता यासाठी तुम्हाला बँकेकडे काहीतरी डिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता असते.
हे कर्ज घेण्यासाठी तुमचा पगार किंवा उत्पन्न कमीत कमी 15 हजार दर महिना असणार गरजेचं आहे या कर्जासाठी बँक 11.13% टक्क्यापासून 13.03% पर्यंत व्याजदर आकारते वर नमूद केलेले सर्व प्रकारचे कर्ज व त्याविषयीची माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात https://www.kvb.co.in/ हे करूर वैश्य बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.