Karnataka Bank Loan : 18 फेब्रुवारी 1924 ला मंगळूर येथे स्थापन झालेली कर्नाटका बँक लिमिटेड ला रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून ए क्लास शेड्युल कमर्शियल बँकेचा दर्जा मिळाला, ही बँक चित्रदुर्ग आणि श्री गिरी शारदा बँकेमध्ये 19 व्या शतकात विलीन झाली, भारतातल्या बावीस राज्यांमध्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८९०४ शाखेसह कर्नाटक बँक कार्यरत आहे.
एकूण 8 हजार 652 कर्मचाऱ्यासह आणि 13 मिलियन ग्राहकसह कर्नाटक बँक सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. या बँकेअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात यामध्ये बचत खाते, सॅलरी अकाउंट, स्टुडन्ट अकाउंट, चिल्ड्रन अकाउंट व चालू खात्याचा समावेश आहे.
यासह बँक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, डिपॉझिट कार्ड, इमेज कार्ड, गिफ्ट कार्ड मध्ये सुद्धा व्यापार करते, वेगवेगळे डिपॉझिट तुम्ही या बँकेमध्ये ठेवू शकता, डिपॉझिट च्या सुविधा कर्नाटक बँक मार्फत दिल्या जातात विमा क्षेत्रात सुद्धा ही बँक कार्य करते, या बँकेकडून तुम्ही जीवन विमा, आरोग्य विमा व सर्वसाधारण विमा काढू शकता.
यासह बँक म्युचल फंड, अटल पेन्शन योजना, नॅशनल पेन्शन स्कीम, केबीएल समृद्धी आणि गोल्डबोंड मध्ये सुद्धा कार्य करते, या सर्व व्यतिरिक्त बँकेमध्ये लॉकर (Karnataka Bank Loan) फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. मनी ट्रान्सफर, बँकिंग या सुविधा ही बँक सहजरित्या पुरवते या सर्व सुविधा व्यतिरिक्त बँक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना देते.
त्यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज इत्यादींचा समावेश होतो,मुख्यता या बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या पाच कर्ज विषयीची सविस्तर माहिती आपण खाली पाहूया.
गृह कर्ज (Karnataka Bank Home Loan)
कर्नाटक बँक विविध तीन योजनेअंतर्गत गृह कर्जासाठी तुम्हाला अर्थसहाय्य करते यामध्ये केबीएल एक्सप्रेस होम लोन, केबीएल एक्सप्रेस होम कम्फर्ट, केबीएल एक्सप्रेस घरनिवेश या योजनेअंतर्गत ही बँक जवळपास 80 टक्के पर्यंत कर्जाचा पुरवठा करते. तुम्ही जर जागा घेऊन घर बांधणार असाल किंवा घराचे इंटेरियर एक्सटेरियर किंवा रिपेरिंग करत असाल तरी सुद्धा बँक तुम्हाला कर्ज देते.
रिनोवेशन साठी रिमॉडलींग साठी आणि एक्सटेरियर साठी बँक 32 लाखाचे कर्ज (Karnataka Bank Loan) देते तर नवीन घर घेण्यासाठी 5 कोटी पर्यंत ही बँक कर्ज देऊ करते या बँकेच्या गृह कर्जासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल त्याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर केबिएल अपना घर याच्यामध्ये तुम्ही हे माहिती पाहू शकता.
त्यानंतर किती वर्षांमध्ये कर्ज फेडायचे आहे त्यासाठी सेक्युरिटी काय द्याची आहे, मार्जिन किती ठेवतो,रेट ऑफ इंटरेस्ट ही बँक किती लावते याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच विविध प्रकारचे होम लोन जे आहेत त्याचे सुद्धा माहिती वेबसाईटवर दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता, कर्नाटका बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.
वाहन कर्ज (Karnataka Bank Vehicle Loan)
कर्नाटका बँक दुचाकी व चार चाकी गाड्यांसाठी कर्जाचा पुरवठा करते विविध योजना अंतर्गत कर्नाटक बँक वाहन कर्ज सर्वसामान्य नागरिकांना देते, ऑन रोड प्राईस च्या 90% एवढी रक्कम कर्नाटका एक्सप्रेस हे माहिती मध्ये तुम्ही घेऊ शकता. नवीन गाडीसाठी जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत आणि वापरलेल्या गाडीसाठी जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्नाटक बँक कर्ज पुरवते.
दुचाकी कर्जामध्ये ही बँक ऑन रोड प्राईस च्या 85 टक्के एवढी रक्कम कर्ज (Karnataka Bank Loan) म्हणून देते जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत कर्ज पुरवते. दुचाकी साठी कर्ज शकता या कर्जाची परतफेड तुम्हाला साठ महिन्याच्या कालावधीमध्ये करण गरजेच आहे.
वैयक्तिक कर्ज (Karnataka Bank Loan – Personal Loan)
गृह कर्ज तसंच वाहन कर्ज याव्यतिरिक्त कर्नाटक बँक वैयक्तिक गरजेसाठी सुद्धा वैयक्तिक कर्ज देऊ करते, सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये कमीत कमी सहा महिने काम करणाऱ्या व्यक्तीस कर्नाटका बॅंके अंतर्गत वैयक्तिक लोन दिले जाते. यासाठी कमीत कमी 21 वर्ष एवढं तुमचं वय असणं आवश्यक आहे.
मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घराच्या पुनर्बांधणीसाठी, फिरण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर करू शकता हे कर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता यासाठी त्यांचे बँकेचे लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता हे कर्ज परतफेड करण्याचा कालावधी साठ महिन्याचा असून साठ महिन्यामध्ये तुम्हाला हे कर्ज फेडावे लागते.
जास्तीत जास्त 5 लाख रुपये एवढे कर्ज बँक तुम्हाला देते 12 ते 17 टक्के दरम्यान या कर्जाचा व्याजदर तुम्हाला लागतो हा व्याजदर इतर बँकापेक्षा थोडा जास्त असल्यामुळे तुम्ही दुसरा पर्याय पाहू शकता.
शैक्षणिक कर्ज (Karnataka Bank Education Loan)
भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवायच असेल तर पैशाची खूप गरज भासते, कर्नाटक बँक त्यांच्या विविध योजना अंतर्गत दहा लाखापासून वीस लाख रुपये पर्यंत शिक्षणासाठी कर्जाचा (Karnataka Bank Loan) पुरवठा करते.
प्रोफेशनल करिअर असो, टेक्निकल असो किंवा इतर कोर्सेस भारताबाहेर किंवा भारतात तुम्ही करायचा विचार करत असाल तर पंधरा वर्षापर्यंत परतफेडच्या कालावधीचा दहा लाख ते वीस लाख रुपये एवढं कर्ज कर्नाटका बँक केबीएल विद्यानिकेतन अंतर्गत मंजूर करते. स्किल लोन सर्टिफिकेट अंर्तगत डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस साठी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन अंतर्गत कर्नाटक बँक 5000 ते 1.5 लाख रुपये एवढे कर्ज देते.
या कर्ज परतफेडीचा कालावधी तीन वर्ष ते सात वर्षाचा असतो यासाठी अर्ज करून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्यांची संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती याविषयी घेऊ शकतात संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.
इतर कर्ज (Karnataka Bank Other Loans)
कर्नाटका बँक वर नमूद केलेल्या कर्जाव्यतिरिक्त विविध प्रकारचे आणखी कर्ज (Karnataka Bank Loan) देऊ शकते ज्यामध्ये सोलार पॅनल साठी दहा लाखापर्यंत कर्ज देते, त्याचा परतफेडीचा कालावधी साठ वर्षाचा असतो.केबीएल इन्स्टा सेस अंतर्गत 10000 ते 5 लाखापर्यंत ही बँक कर्जाचा पुरवठा करते.
साठ महिने ते 24 महिन्याच्या ओव्हर ड्रॅफ़्ट सह तुम्ही हे कर्ज घेऊ शकता हे सर्व कर्ज आणि या विषयाची माहिती तुम्ही कर्नाटका बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता कर्नाटक बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://karnatakabank.com/ हे आहे त्यावर गेल्यानंतर लोन्स या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळेल विविध प्रकारच्या कर्ज विषयीचे सविस्तर माहिती तुम्ही तिथून पाहू शकणार आहात.