JK Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

JK Bank Loan : जम्मू अँड काश्मीर बँक शेड्युल कमर्शिअल बँक म्हणून प्रायव्हेट क्षेत्रातील बँक आहे हे बँक 1938 मध्ये कार्यरत झाली असून रिजर्व बँकेच्या नोंदीप्रमाणे ऑफिस श्रीनगर जम्मू-काश्मीर येथे आहे आणि हेडक्वार्टर सुद्धा या बँकेचे जम्मू-काश्मीरलाच आहे, भारतभरामध्ये विविध राज्यात ही बँक कार्यरत असून 996 ब्रांचेस आणि 1414 एटीएम सह बँक भारतातल्या 18 राज्यांमध्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करते.

या बँकेमार्फत विविध प्रकारच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जातात त्यामध्ये बचत खाते, चालू खाते, सॅलरी खाते, विद्यार्थ्यांसाठी बचत खाते, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बचत खाते, जीवन विमा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स डिपॉझिट आणि विविध प्रकारचे लोन बँक सर्वसामान्य नागरिकांना व कर्मचाऱ्यांना देऊ करते.

या बँकेमध्ये गृह कर्ज, ग्राहक कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, स्मार्टफोन साठी (JK Bank Loan) कर्ज, कार लोन घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी कर्ज दिले जाते, मुख्यता काही प्रकारच्या कर्जामध्ये ही बँक चांगल्या प्रकारे कार्य करते, ज्यामध्ये विविध खाली दिलेल्या कर्जाचा समावेश आहे.

गृहकर्ज (JK Bank Loan – Home Loan)

जम्मू का जम्मू काश्मीर बँक नवीन घर घेण्यासाठी, घराचे बांधकाम करण्यासाठी, जागा घेण्यासाठी, घराची पुनर्रबांधणी इत्यादीसाठी कर्जाचा पुरवठा करते, कोणीही वैयक्तिक व्यक्ती या कर्जासाठी अर्ज करू शकतात. ज्यामध्ये पगारदार वर्ग,पेन्शनर असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा व्यवसायिक असले तरीही या कर्जासाठी अर्ज करू शकता.

या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर कमीत कमी वय अठरा वर्ष आवश्यक आहे, तुम्ही जागा, बिल्डिंग किंवा घर विकत घेत असाल तर तुम्हाला त्या जागेच्या एकूण रकमेच्या 75 टक्के एवढे कर्ज ही बँक देऊ करते. या कर्जाची परतफेड तुम्हाला तीस वर्षाच्या आत करायची आहे.

याचा व्याजदर 8.85% पासून चालू होतो तुमच्या क्रेडिट हिस्टरी वर तुमच्या कर्जाचा व्याजदर अवलंबून असतो यासाठी 0.25 टक्के एवढे प्रक्रिया शुल्क ही बँक आकारते, तसेच पाचशे रुपये व अतिरिक्त जीएसटी एवढे इन्स्पेक्शन चार्जेस सुद्धा ही बँक गृह कर्ज देण्यासाठी घेते.

शैक्षणिक कर्ज (JK Bank Education Loan)

भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षणासाठी ही बँक शैक्षणिक कर्ज पुरवते, यासाठी भारतीय नागरिक असणे तुम्ही गरजेचे आहे आणि तुम्ही बारावी पास असणं सुद्धा आवश्यक आहे. तुमचं वय कमीत कमी कितीही असलं तरी चालते पण जास्तीत जास्त 35 वर्ष असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

तुम्ही भारतामध्ये जर (JK Bank Loan) शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करत असाल तर त्याचे वेगवेगळे कोर्सेस बँकेने त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहेत, भारताच्या बाहेर जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्याविषयीची सुद्धा माहिती दिलेली आहे, ग्रॅज्युएशन कोर्स,पोस्ट ग्रॅज्युएशन विविध प्रकारचे कोर्सेसाठी ही बँक कर्जाचा पुरवठा करते.

जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत ही बँक शैक्षणिक कर्ज सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देते तुम्ही भारतात शिक्षण घेत असाल तर 95% कर्ज पुरवठा बँक करते यासाठी व्याजदर बँकेने ठरवलेल्या नियमानुसार घेतले जाते त्याची माहिती तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर पाहू शकता याची प्रोसेसिंग चार्जेस भारतातील शिक्षणासाठी निल असून भारताबाहेर शिक्षण घेत असाल तर एक टक्के एवढे प्रोसेसिंग चार्जेस तुम्हाला बँकेला द्यायला लागते.

मोबाईल कर्ज (JK Bank Loan for Smartphone)

जम्मू आणि काश्मीर बँका स्मार्टफोन घेण्यासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते, टर्म लोन अंतर्गत ही बँक नवीन मोबाईल घेण्यासाठी तुम्हाला कर्ज देऊ करते आयफोन, ब्लॅकबेरी, अँड्रॉइड आणि विंडोज च्या फोनसाठी जम्मू काश्मीर बँक कर्जपुरवठा करते, यामध्ये पर्मनंट, कंत्राटी सरकारी कर्मचारी तसेच एका कंपनीमध्ये दोन वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही बँक कर्जाचा पुरवठा करते.

हे कर्ज घेण्यासाठी तुमचं कमीत कमी वय 21 वर्ष असाव आणि जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही कर्ज घेऊ शकता, कमीत कमी 10 हजारापासून जास्तीत जास्त 75 हजार रुपये पर्यंत बँक कर्जाचा पुरवठा करते. एकूण रकमेच्या 90 टक्के एवढं कर्ज ही बँक सर्वसामान्य नागरिकांना देते.

350 रुपये एवढे प्रक्रिया शुल्क ही बँका घेते 30 महिन्यामध्ये हप्ते तुम्हाला भरून लोनची (JK Bank Loan) परतफेड करायला लागते, तीन टक्के एवढे फिक्स व्याजदर हे तुम्हाला लागू असेल तर स्मार्टफोन घेण्यासाठी तुम्ही कर्ज पाहत असाल तर हे एक चांगला ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे.

मॉड्युलर किचन लोन (JK Bank Loan for Modular Kitchen)

नवीन घर घेतल्यानंतर आपण घराच्या विविध सजावटीसाठी कर्ज पाहतो पण काही काही वस्तूसाठी कोणती बँक कर्ज देत नाही जम्मू आणि काश्मीर बँक मॉड्युलर किचनसाठी टर्म लोन अंतर्गत तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही एका कंपनीमध्ये तीन वर्ष काम केलेलं असणं आवश्यक आहे.

जर प्रोफेशनल असाल तर तुम्ही डॉक्टर,चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनिअर असाल तर दोन वर्ष तुमचं काम किंवा व्यवसाय चालू असणे गरजेचे आहे. तुमचं वय 18 वर्ष ते जास्त जास्त 60 वर्षापर्यंत असाव, यासाठी पाच लाख पर्यंत कर्ज तुम्हाला ही बँक देते, जास्तीत जास्त 80 टक्के पर्यंत कर्ज जम्मू आणि काश्मीर बँक तुम्हाला देऊ करते.

जे तुम्ही वस्तू घेणार आहात ते वस्तू गहाण ठेऊन ही बँक तुम्हाला (JK Bank Loan) कर्जाचा पुरवठा करते, यासाठी झिरो पॉईंट पाच टक्के एवढी अमाउंट प्रक्रिया शुल्क म्हणून घेतली जाते, अडीच लाखापर्यंतच्या कर्जासाठी 72 महिन्याचा परतफेड कालावधी बँकेने ठेवला असून अडीच लाखापेक्षा जास्त कर्जासाठी 84 महिन्याचा हप्ता या बँकेने ठेवलेला आहे.

तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तीन टक्के एवढे व्याजदर तुम्हाला फिक्स असेल आणि इतर वर्गातून येत असाल तर साडेतीन टक्के एवढे व्याजदर तुम्हाला लागेल. यासाठी सुद्धा तुम्ही बँकेच्या वेबसाईटला विजिट देऊ शकतात तसेच जवळपास बँकेत जाऊन यासाठी अर्ज सुद्धा करू शकता.

सोलर इक्विपमेंट लोन (JK Bank Solar Equipment Loan)

सोलर रिक्रुटमेंट फायनान्स सध्याच्या घडीला सोलार अवजारे, सोलार च्या वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे जम्मू आणि काश्मीर बँक आर्थोराइज डीलर कडून तुम्ही सोलार चे प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्यावर कर्जाचा पुरवठा करते. सरकारी, निमसरकारी, खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच रिटायर गव्हर्मेंट कर्मचारी सुद्धा या कर्जासाठी पात्र असतील.

तुमच्या मंथली इन्कमच्या 12% अधिक एवढी रक्कम तुम्हाला ही बँक (JK Bank Loan) कर्जाच्या स्वरूपात देते जास्तीत जास्त 50000 एवढी रक्कम तुम्हाला ही बँक देऊ करते त्या साठी कोणते तारण ठेवण्याची तुम्हाला गरज नाही किंवा गॅरेंटर द्यायची सुद्धा आवश्यकता बँकेत पडत नाही.

50 हजारासाठी तुम्हाला 500 रुपये प्लस जीएसटी एवढे प्रक्रिया शुल्क बँकेला अदा करायला लागते या कर्जासाठी व्याजाचा दर तीन टक्के एवढा असून हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 36 महिन्यामध्ये परतफेड करू शकता.

जर तुम्हाला सांगितलेल्या वरून कोणते कर्जापैकी तुम्ही कर्ज घेण्याची इच्छुक असाल किंवा तुम्हाला या कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही जम्मू-काश्मीर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कर्ज विषयीची माहिती पाहू शकता https://www.jkbank.com/ संकेतस्थळ आहे.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *