Indusind Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Indusind Bank Loan : सन 1994 मध्ये श्रीचंद हिंदुजा यांनी इंडसइंड बँकेची स्थापना केली आज रोजी ही बँक संपूर्ण भारतभरात 2631 शाखेसह आणि 2903 एटीएम सह 1 लाख 43 हजार गावांना वेगवेगळ्या सुविधा पुरववते, ही बँक भारतातच नसून भारताच्या बाहेर लंडन, दुबई, अबुधाबी येथे सुद्धा या बँकेच्या शाखा आहेत.

संपूर्ण भारतभरात 37 मिलियन कस्टमर साठी बँकेमार्फत विविध प्रकारच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जातात ही बँक बचत खात्यावर 6.75%, एफडीवर 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढीवर 8.25 टक्के एवढे व्याजदर देते.

विविध सुविधा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात ज्यामध्ये बचत खाते, एफ डी, सोशल सेक्युरिटी म्युचल फंड, होम लोन, भारताच्या बाहेर पैसे पाठवणे, उद्योग रजिस्ट्रेशन, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज इत्यादी सुविधा सर्वसामान्य नागरिकांना देते.

लोन व्यतिरिक्त या बँकेचे इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट सुद्धा काम व्यवस्थित रित्या चालते ही बँक वेगवेगळ्या प्रकारचे कमर्शियल, बिजनेस, प्रीपेड डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सर्वसामान्य नागरिकांना देते वरील सर्व सुविधा व्यतिरिक्त बँके विविध प्रकारचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना देते.

ज्यामध्ये वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, कृषी कर्ज, मेडिकल रिक्रुटमेंट लोन, लोन अगेन सेक्युरिटी, होम लोन, पर्सनल लोन इत्यादी कर्जाचा पुरवठा (Indusind Bank Loan) करते, मुख्यतः ही बँक ज्या कर्जामध्ये सर्वाधिक काम करते त्या कर्जाची सविस्तर माहिती खाली दिलेल्या आहे त्याची डिटेल्स पाहून तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून कर्जासाठी अर्ज करू शकता.

वाहन कर्ज (Indusind Bank Vehicle Loan)

वाहन कर्जामध्ये इंडसइंड बँक दुचाकी वाहन, नवीन कार साठी,वापरलेल्या कार साठी,लहान कमर्शियल व्हेईकल साठी, मोठ्या कमर्शियल व्हेईकल साठी, ट्रॅक्टर साठी आणि इतर शेतीच्या साहित्यासाठी वेगवेगळ्या कर्जाचा पुरवठा करते, या बँकेचे व्याजदर सुद्धा इतर बँकापेक्षा सर्वाधिक चांगले असून त्या बँकेच्या वाहन कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 60 महिन्यापर्यंत परतफेड करू शकता.

अत्यंत जलद गतीने कमीत कमी कागदपत्रात हे बँक वाहन कर्जाचा (Indusind Bank Loan) पुरवठा करते 25 लाखापर्यंत ऑन रोड प्राईस च्या शंभर टक्के कर्ज हे बँका सर्वसामान्य नागरिकांना देते, या बँकेतून तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख गरजेच आहे, तुमचं वय 23 ते साठ वर्ष दरम्यान असेल आणि तुम्ही एकच कंपनीत कमीत कमी तीन वर्ष राहण आवश्यक आहे.

तुमच्याकडून ही बँक फॉर्म 16, मागच्या वर्षीचा मागचे तीन महिन्याचे सॅलरी स्लिप्स,मागच्या तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट घेते बँकेचे चार्जेस विषयीची माहिती त्यांनी पीडीएफ मध्ये दिलेली असून बँकेच्या संकेतस्थळावरून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता

कृषी कर्ज (Indusind Bank Loan – Agri Loan)

कृषी व्यवसायासाठी ग्रामीण भागात इंडसइंड बँक भरपूर मोठ्या प्रमाणात काम करते, इंडस किसान अंतर्गत हे बँक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप लोन, इन्वेस्टमेंट लोन अगदी जलद गतीने देते, हे कर्ज (Indusind Bank Loan) फेडण्यासाठी बँक पाच वर्षाचा कालावधी शेतकऱ्यांना देते आणि या कर्जाचा निपटारा जलद गतीने करते.

या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळपास शाखे मध्ये जाऊन भेट देण आवश्यक असते त्या बँकेअंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज वेगवेगळ्या व्याजदरावर घेऊ शकता हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतातील शेतकरी असणे महत्त्वाचा आहे तुमच्याकडे शेती असणे सुद्धा तेवढा आवश्यक असणार आहे तुमच्या सिबिल स्कोर कर्ज देण्या अगोदर एकदा तपासला जातो आणि त्यानंतर तुम्हाला  रक्कम दिली जाते.

गृह कर्ज (Indusind Bank Home Loan)

ही बँक नवीन घर घेण्यासाठी प्लॉट खरेदीसाठी जागा खरेदीसाठी नवीन घरावर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी घर वाढवण्यासाठी रिसेल घरावर सुद्धा बँक कर्ज देते बॅलन्स ट्रान्सफर फॅसिलिटी सुद्धा या बँकेमध्ये अवेलेबल आहे या बँकेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं कमीत कमी एक लाख रुपये दर वर्ष असायला पाहिजे आणि कमीत कमी व एकवीस वर्ष असणे गरजेचे आहे.

एका कंपनीमध्ये तुम्ही एक वर्ष तरी काम केलेला असणे आवश्यक आहे हे कर्ज (Indusind Bank Loan) घेते वेळेस तुम्हाला प्रॉपर्टीज कागदपत्र उत्पन्नाचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड, बॅलन्स ट्रान्सफर चे कागदपत्र बँकेकडे जमा करायला लागतात ही बँक तुमचं क्रेडिट हिस्टरी व सिबिल स्कोरर आधारित तुम्हाला गृह कर्जाचा पुरवठा करा

वैयक्तिक कर्ज (Indusind Bank Loan – Personal Loan)

ऑनलाईन मोबाईल द्वारे इंडसइंड बँक पर्सनल लोन सर्वसामान्य नागरिकांना देते सोप्या चार स्टेप मध्ये तुम्ही अर्ज करू शकता, सर्वप्रथम तुम्हाला त्यांचं मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायच आहे किंवा ऑनलाईन खाली दिलेल्या लिंक वर जायचं आहे. तुमची सविस्तर माहिती भरायची आहे. तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या ऑफर्स तुम्हाला बघायचं आहे.

ते एप्लीकेशन कम्प्लीट करून व्हिडिओ केवायसी तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर काही वेळातच एग्रीमेंट झाल्यावर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात कमीत कमी कागदपत्रांमध्ये 01 ते 06 वर्षाच्या काळासाठी इंडसइंड बँक वैयक्तिक कर्ज देते, यासाठी तुम्ही पगारदार वर्गातून अर्ज करत असेल तर त्यासाठी 21 वर्षे ते 60वर्षे एवढे तुमचे वय असणे आवश्यक आहे.

कमीत कमी पगार 25 हजार एवढा असेल तर तुम्ही या (Indusind Bank Loan) कर्जासाठी अर्ज करू शकता, एकाच कंपनीत तुम्ही एक वर्ष तरी असणं गरजेचं आहे आणि एकूण अनुभव तुम्हाला दोन वर्षाचा असेल तर तुम्ही एका कर्जासाठी अर्ज करू शकता अर्ज करताना तुम्हाला अर्जचा नमुना, ओळखीचा पुरावा, केवायसी डॉक्युमेंट्स, उत्पन्नाचा पुरावा, आणि मागच्या तीन महिन्याचे स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.

लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी तुम्ही या बँके मार्फत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता सर्व प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, जर तुम्ही इच्छुक असेल आवश्यकता असेल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता गरजेच्या काळात हे चांगलं ऑप्शन तुमच्याकडे असू शकत.

मेडिकल इक्विपमेंट लोन (Indusind Medical Equipment Loan)

तुम्ही मेडिकल प्रोफेशनल असाल, तुम्हाला कोणत्या मशीनरीज घ्यायच्या असतील तर इंडसइंड बँक त्यासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते इसीजी मशीन, एमआरएस स्कॅनर, अल्ट्रा साऊंड स्कॅनर, सिटीस्कॅन, एक्स-रे मशीन, कलर डॉप्लर, कॅमेरा मेमोग्राफी,मोनोग्राफ एक्स-रे, प्लुरोस्कोप इत्यादी प्रकारच्या मशीनसाठी इंडसइंड बँक तुम्हाला कर्ज देऊ करते.

हे कर्ज टर्म लोन अंतर्गत येते कमीत कमी 3 लाख जास्तीत जास्त 10 कोटी पर्यंत ते कर्ज (Indusind Bank Loan) इंडसइंड बँक देते तुमच्या दरवाज्यावर येऊन कमीत कमी कागदपत्रांमध्ये अधिक जलद गतीने कर्जाचा पुरवठा केला जातो, हे कर्ज तुम्हाला एक ते सात वर्षांमध्ये परतफेड करणं गरजेचं असतं.

यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि मागच्या सहा महिन्याची बँक स्टेटमेंट इथे जोडायला लागते जर कंपन्या असेल तर त्याची रजिस्ट्रेशन ची कागदपत्र, तुमचं सिबिलचा रेकॉर्ड, पॅन कार्ड अगोदर चेक करते आणि तुमच्या सिबिल वर आधारित बँक मेडिकल इक्विपमेंट साठी लोन देते.

हे लोन घेण्यासाठी तुमचं वय 25 ते 70 च्या दरम्यान असणार आवश्यक आहे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस बँक लावते त्या चार्जेसचा रेट आणि सविस्तर माहिती त्यांच्या संकेतस्थळावर दिलेली आहे हे लोन पाच लाखापासून दहा कोटी पर्यंत तुम्हाला मिळतं एक टक्के एवढा प्रक्रिया शुल्क ही बँक आकारते.

11 टक्के पासून पुढे याचा व्याजदर तुम्हाला लागू होते तुम्हाला हे लोन घ्यायचा असेल किंवा वर दिलेले वेगवेगळे लोन आहेत ते घ्यायचे असतील तर https://www.indusind.com/ या इंडसइंड बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता आणि गरज असेल तर हे कर्ज घेऊन तुमची गरज भागवू शकता.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *