Indian Overseas Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Indian Overseas Bank Loan : इंडियन ओव्हरसीज बँक नाव सर्वांनी ऐकलं असेल 10 फेब्रुवारी 1937 ला श्री एम चिदंबरम चिट्ठी यांनी स्थापन केलेल्या या बँकेत मार्फत विविध सुविधा संपूर्ण भारतभर तसेच भारताच्या बाहेर इतर चार देशांमध्ये सुद्धा दिल्या जातात. या बँकेच्या शाखा भारतामध्ये तर आहेतच याशिवाय भारताच्या बाहेर सिंगापूर, हॉंगकॉंग, थायलंड आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा या बँकेच्या शाखा आहेत.

1969 साली या बँकेला राष्ट्रीयकृत बँकेचा दर्जा देण्यात आला आणि संपूर्ण भारतभर 195 शाखेसह ही बँक सध्या कार्य करते या बँकेमध्ये चालू खाते, बचत खाते, लॉकर्स या व्यतिरिक्त फॉरेन एक्सचेंज, कृषी आणि ग्रामीण विभागातील विविध आर्थिक पुरवठा केला जातो. या बँकेमार्फत विविध प्रकारचे कर्ज सुद्धा दिल्या जातात या कर्जामध्ये मुख्यतः गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी कर्जाचा समावेश होतो.

या बँकेचा कर्जाचा व्याजदर सुद्धा खूप कमी आहे गृहकर्जासाठी 8.40% पासून व्याजदर चालू होतो सोनेतारण कर्जा (Indian Overseas Bank Loan) साठी 8.85 टक्के व्याजदर चालू होतो. वैयक्तिक कर्जासाठी 10.85% एवढा व्याजदर ही बँका करते तुम्ही खाली दिलेल्या प्रत्येक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील बँकेच्या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जिथून बँकेचे वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोणत्याही कर्जासाठी अर्ज करू शकता मुख्यतः आणि महत्त्वाचे पाच कोणते कर्ज या बँकेमार्फत दिले जातात आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण खाली पाहुयात.

गृह कर्ज (IOB Home Loan)

ही बँक घराच्या 75% ते 90% पर्यंत कर्जाचा पुरवठा करते तीस वर्षापर्यंत या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकता कमीत कमी प्रोसेसिंग शुल्क मध्ये ही बँक लवकरात लवकर तुमचे कर्ज प्रोसेस करते. हे कर्ज तुम्ही घेत असाल किंवा घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे दोन ते तीन वर्ष कमीत कमी परमानंट जॉब असायला पाहिजे.

जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल किंवा कोणता व्यवसाय करत असेल तर शेवटच्या तीन वर्षाच्या ऍक्टिव्हिटीज, आयटीआर तुम्हाला तिथे जोडावे लागतील. तुम्ही घेत असलेल्या प्रॉपर्टीच्या 75% ते 90% लोन तुम्हाला बँके मार्फत दिले जाते,आणि त्याचा व्याजदर ८.४० % पासून पुढे लागतो.

कार लोन (Indian Overseas Bank Loan – Car Loan)

मध्यमवर्ग्याचा किंवा सर्वांच स्वप्न असतं की आपण आपल्या कारमध्ये कधीतरी राईड करावी हे कार घेण्यासाठी आपण धडपड तर करतच असतो, पण कधी कधी पूर्ण रक्कम आपल्याकडे जमा होत नाही तर त्यासाठी कार लोन हा एक पर्याय आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत 84 महिन्यासाठी तुम्हाला कार लोनचा पुरवठा केला जातो जास्तीत जास्त 90% पर्यंत तुम्ही हे लोन घेऊ शकता चांगला सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला या बँकेमार्फत (Indian Overseas Bank Loan)चांगलं कन्सेशन सुद्धा मिळतं, लवकरात लवकर प्रोसेस केली जाते, स्वतःचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

तुमचं कमीत कमी उत्पन्न हे 8000 तरी गरजेचं आहे आठ हजार उत्पन्न महिन्याचा असेल तर तुम्ही या बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता व्याजदर विषयाची संपूर्ण माहिती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची पीडीएफ डाऊनलोड करून पाहू शकता.

वैयक्तिक कर्ज (IOB Personal Loan)

अगदी गरजेच्याच वेळेस सर्वांना लवकरात लवकर पैसे मिळावे अशी अपेक्षा असते, वैयक्तिक कर्ज इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत (Indian Overseas Bank Loan) चांगल्या व्याजदर दिला जातो. 10.45% पासून वैयक्तिक कर्ज कर्जाचा व्याजदर चालू होतो, तुमच्या सिबिलनुसार आणि मागच्या रेकॉर्डनुसार तुम्हाला वैयक्तिक कर्ज बँक देते.

सोनेतारण कर्ज (Indian Overseas Bank Loan – Gold Loan)

वैयक्तिक कर्जानंतर सोनेतारण कर्ज हे गरजेचे वेळेस कामी पडणार कर्ज आहे आणखी सोनेतारण कर्जासाठी इंडियन ओव्हरसीज बँक मार्फत तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. तुम्हाला पाहिजे त्यावेळेस बँके मार्फत सोनेतारणावर कर्ज दिले जाते.

कालावधीच्या अगोदर जर तुम्ही सोने सोडवून घेत असाल तर याचं कोणतेही चार्जेस बँक आकारत नाही सोनेतारण कर्ज साठी तुमचं वय कमीत कमी 18 असावं किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावा आणि तुम्ही जे दागिने ठेवणार आहात त्या दागिने तुमचे स्वतःचे असावेत जास्तीत जास्त ५० ग्राम पर्यंत दागिने तुम्ही बँकेमध्ये ठेवू शकता.

या बँकेच्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्या योजनेअंतर्गत तुम्ही पाहून व्यवस्थित चौकशी करून तुम्ही अर्ज करू शकता, ऑनलाइन पद्धत आहे 7% पासून या कर्जाचा व्याजदर सुरू होतो वर दिलेल्या कर्जाच्या तपशीला व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या योजना द्वारे बँक कर्जाचा पुरवठा करते.

ज्यावेळी किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा साधे क्रेडिट कार्ड असेल याद्वारे सुद्धा बँक कर्ज देते या बँकेमध्ये तुम्ही बचत खाते उघडू शकता, चालू खाते उघडू शकता, सरकारच्या काही योजना असतील तर त्या योजनाचा सुद्धा लाभ घेऊ शकता.

आणि व्यवसायासाठी काही योजना असतील तर त्या योजना विषयी सुद्धा या बँकेमार्फत तुम्ही अर्ज करू शकता राष्ट्रीयकृत बँका असल्यामुळे तुम्हाला कोणती काळजी करायची गरज नाही वरीलपैकी कोणत्या लोन साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर या बँकेची अधिकृत वेबसाईट https://www.iob.in/ वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *