Indian Bank Loans : इलाहाबाद बँक सोबत कार्यरत असणाऱ्या शंभर वर्षा पेक्षा अधिक जुनी असणाऱ्या इंडियन बँकेकडून विविध प्रकारच्या सुविधा भारतामध्ये दिल्या जातात, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा या बँकेचा विविध शाखा उपलब्ध असून या बँकेचे नेटवर्क सुद्धा आतापर्यंत खूप चांगले आहे.
बँक विविध प्रकारच्या कर्जाचे पर्याय सर्वसामान्य नागरिकांपुढे उपलब्ध करून देते यामध्ये ऑनलाईन ऑफलाइन कर्ज सुद्धा तुम्ही घेऊ शकता बँकेमार्फत चालू खात, बचत खात, तसेच क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्ही घेऊ शकता या बँकेकडून विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा केला जातो.
त्यामध्ये कृषी कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यवसायासाठी कर्ज, कार्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्ज, ऑनलाईन कर्ज, फिफ्टी नाईन मिनिट्स लोन हे पर्याय उपलब्ध आहेत. या बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध कर्जाचा (Indian Bank Loans) सविस्तर तपशील तुम्ही खालील प्रकारे पाहू शकता.
कृषी कर्ज (Indian Bank Loans – Agriculture Loan)
ही बँक एग्रीकल्चर लोन मध्ये विविध योजनेअंतर्गत कर्जाचा पुरवठा करते या बँकेअंतर्गत तुम्ही गोडाऊन घेण्यासाठी, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी, कृषी प्रोसेसिंग सेंटर उभं करण्यासाठी, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत डेअरी लो,न फुड आणि ऍग्रो प्रोसेसिंग युनिट लोन, कृषी इन्फ्रा फंड, इंड किसान संरक्षण मित्र, इंड मायक्रो फूड प्रोसेसिंग, इंड कृषी वाहन केसीसी इत्यादी कर्जाच्या पर्याय कृषी कर्ज अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी इंडियन बँक देते.
विविध कर्जाच्या स्वरूपानुसार कर्जाचा व्याजदर व त्यासाठी लागणारे कागदपत्र याची माहिती तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावरून घेऊ शकतात अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.
वैयक्तिक कर्ज (Indian Bank Personal Loan)
गरजेच्या वेळेस सोनेतारण कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे दोन पर्याय आपल्यापुढे उपलब्ध असतात, इतर कोणाकडून घेण्यापेक्षा या दोन कर्जांतर्गत तुम्ही लोन किंवा पैसे वापरासाठी घेऊ शकता. इंडियन बँक अंतर्गत विविध प्रकारचे वैयक्तिक कर्ज तुम्हाला दिलं जातं, यामध्ये सॅलरी लोन, लोन अगेन्स एफडी ओव्हर ड्राफ्ट, पेन्शन लोन इत्यादीचा समावेश आहे.
गृह कर्ज (Indian Bank Home Loan)
इंडियन बँक इतर कर्ज सोबतच गृह कर्ज सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना देते गृह कर्जासाठी चे विविध पर्याय या बँकेकडे उपलब्ध असून आयबी होम लोन कॉम्बो अंतर्गत तुम्ही वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज हे दोन्ही कर्ज घेऊ शकतात.
यानंतरच ओव्हर ड्राफ्टच्या अगेन्स सुद्धा तुम्ही कर्ज (Indian Bank Loans) घेऊ शकणार आहात, तुम्ही कर्ज घेत असाल किंवा घराचे डागडुजी करण्यासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, रिव्हर्स मॉर्गेज या स्कीमांतर्गत इंडियन बँक कर्जाचा पुरवठा करते.
जागा घेण्यासाठी सुद्धा इंडियन बँक आयबी प्लॉट लोन या अंतर्गत कर्जाचा पुरवठा करते आयबी होम लोन अंतर्गत पगारदार वर्गासाठी, व्यावसायिकासाठी तसेच, पेन्शनधारकासाठी इंडियन बँक गृह कर्जाचे पर्याय उपलब्ध करून देते.
हे सर्व कर्जासाठी तुमचं हे कमीत कमी 18 वर्षापेक्षा जास्त असण आवश्यक आहे, घराची डागडुजी करण्यासाठी घरामध्ये इंटरियर करण्यासाठी सुद्धा तुम्ही कर्जाचा वापर करू शकता.
व्यावसायिक कर्ज (Indian Bank Loans – MSME Loan)
इंडियन बँकेच्या अंतर्गत छोट्या मोठ्या सर्व व्यवसायासाठी कर्जाचा पुरवठा केला जातो, यामध्ये आयबी ट्रेड, इंड MSME सेक्युअर, इंड MSME वाहन, आयबी कॉन्ट्रॅक्टर,आयबी डॉक्टर प्लस, इंडिया सूर्यशक्ती, ऑनलाइन शिशु मुद्रा लोन, जीएसटी ऍडव्हान्टेज, इंडिया सखी व पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाईन कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत, संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या कर्जाची सविस्तर माहिती घेऊ शकतात व कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकतात.
फिफ्टी नाईन मिनिट्स लोन (PSB Loans in 59 Minutes)
पब्लिक सेक्टर बँके मधून एका तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने कर्जाचा पुरवठा केल्या जातो यामध्ये इंडियन बँके अंतर्गत सुद्धा तुम्ही पीएसबी लोन इंन फिफ्टी नाईन मिनिट्स डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन कर्ज घेऊ शकता.
तुम्ही जर या अगोदर लोन (Indian Bank Loans) काढले असेल तर तुम्हाला हे लोन साजरीत्या मिळू शकते जर नसेल काढलेले तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो यासाठी पहिले नोंदणी करून त्यानंतर तुम्ही सर्व डिटेल्स भरू शकता. यांच एप्लीकेशन तुम्हाला डाऊनलोड करायला लागेल एप्लीकेशन तुम्ही गुगल प्ले किंवा ॲप स्टोअर वरून सुद्धा डाउनलोड करू शकता.
आयफोन किंवा अँड्रॉइड मधून तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन अंतर्गत https://www.psbloansin59minutes.com/ वर जाऊन एका तासाच्या आत कर्ज मिळवू शकता कमीत कमी व्याजदरामध्ये चांगल्या प्रकारचे कर्ज तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे.
वर दिलेल्या सर्व कर्जापैकी कोणतेहि कर्ज तुम्ही घेऊ इच्छित असाल तर इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल इंडियन बँकेचे अधिकृत वेबसाईट https://www.indianbank.in/ ही आहे यासाठी सर्व कर्जाचा सविस्तर तपशील पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही करू शकता.