IDFC First Bank Loan : आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्ट या फायनान्शिअल सेक्टर मधल्या दोन कंपन्यांचे मिळून आयडीएफसी फर्स्ट बँक तयार झाली या बँकेमार्फत विविध प्रकारचे लोन, इन्शुरन्स, चालू खाते, बचत खाते, डिपॉझिट, कॅश मॅनेजमेंट सोलुशन, फास्ट डिपॉझिट कॅश सुविधा पुरविल्या जातात.
आयडीएफसी फर्स्ट बँक अत्यावश्यक असलेल्या एकूण 28 सेवा झिरोचार्जेस मध्ये सर्वसामान्य ग्राहकांना देते, गेल्या काही दिवसापासून आयडीएफसी फर्स्ट बँक सर्वसामान्यांना सहजपणे समजून घेते. कस्टमर फर्स्ट ब्रीदवाक्य ठेवून आयडीएफसी फर्स्ट बँक विविध आर्थिक क्षेत्रात कार्य करते.
सॅलरी अकाउंट, बचत खाते, चालू खाते, सीनियर सिटीजन अकाउंट काढू शकता, विविध प्रकारचे म्युचल फंड, इन्शुरन्स, डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्ही काढून त्यात सुद्धा या बँकेच्या सुविधा वापरू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सुविधा सुद्धा दिले जातात, फॉरेक्स साठी सुद्धा ही बँक कार्य करते.
या व्यतिरिक्त ही बँक वैयक्तिक कर्ज, कंजूमर ड्युरेबल लोन, होम लोन, नवीन कार लोन, टू व्हीलर लोन, कमर्शियल व्हेईकल लोन, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन इत्यादी कर्जाविषयीच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना देते.
या बँकेचा व्याजदर सुद्धा चांगल्या प्रकारचा असल्यामुळे आणि ही बँक मागच्या काही वर्षापासून उत्तम रित्या काम करत असल्यामुळे कोणते कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एकदा बघू शकता आणि त्यांचे संपूर्ण माहिती घेऊ शकता, बँकेमार्फत देण्यात येणारे कर्ज आणि त्याच्या विषयी थोडक्यात सविस्तर माहिती आपण बघूयात.
वैयक्तिक कर्ज (IDFC Personal Loan)
आयडीएफसी फर्स्ट बँक तब्बल एक करोड रुपये पर्यंत आकर्षक व्याजदर वर आपल्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज देते एक करोड रुपये पर्यंत वैयक्तिक कर्ज देणारे आयडीएफसी फर्स्ट दुसरी बँक आहे कोणत्याही प्रकारचे तारण तुम्हाला या कर्जासाठी ठेवण्याची गरज पडत नाही.
इतर कोणते तुम्ही (IDFC First Bank Loan) वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा बॅलन्स असेल तर तुम्ही ट्रान्सफर करून ते सुद्धा वापरू शकता एक लाखासाठी 1699 रुपये एवढा कमी ईएमआय आयडीएफसी फर्स्ट बँकेचे वैयक्तिक कर्जासाठी येतो. कोणतेही फिजिकल डॉक्युमेंटेशन येत नसल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही हे सर्व काम करू शकता आणि कर्ज सुद्धा सहजरीत्या मिळू शकतात.
कंजूमर ड्युरेबल लोन (IDFC Consumer Durable Loan)
घरामध्ये एसी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल्स वस्तू घेण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँक तुम्हाला जलद गतीने कंजूमर ड्युरेबल लोन देते. 25 हजारापासून 5 लाखापर्यंत तुम्ही कंजूमर ड्युरेबल लोन या बँकेमार्फत घेऊ शकता. आकर्षक व्याजदरावर तुम्हाला ही बँक NO Cost EMI फायनान्सिंग देत असते.
इन्स्टंट अप्रोल तुम्ही या बँकेमार्फत मिळवू शकता हे (IDFC First Bank Loan) कर्ज घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 21 ते 65 दरम्यान असावा आणि तुम्ही या अगोदरचे कस्टमर असणे गरजेचे आहे किंवा या अगोदर कोणतरी कर्ज घेतलेला असणे गरजेचे आहे. तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल किंवा स्वतः व्यवसाय करत असाल तरी या बँकेमार्फत तुम्ही अर्ज करू शकता.
गृह कर्ज (IDFC First Bank Loan – Home Loan)
आयडीएफसी फर्स्ट बँक आकर्षक व्याजदरावर गृहकर्जाचा पुरवठा करते 100% ट्रान्सफर सुद्धा करून देते, पाच करोड रुपये पर्यंत गृह कर्ज तुम्ही आयडीएफसी बँकेकडून घेऊ शकता. हे कर्ज 30 वर्षांमध्ये तुम्हाला फेडायच आहे, ऑनलाइन पद्धतीने तुम्ही या बँकेकडून गृह कर्ज घेऊ शकता.
हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही पगारदार पगारदार वर्गातून आवश्यक आहे, भारतीय नागरिक असले आणि नसले तरी तुम्ही कर्ज (IDFC First Bank Loan) घेऊ शकता तुमचं वय 21 ते 60 वर्ष पर्यंत असावा आणि कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये एवढे उत्पन्न तुमच्या असावे,या कर्जासाठी तुम्हाला 12 महिने ते 360 महिने एवढे एवढा कालावधी परतफेडीसाठी मिळतो.
शैक्षणिक कर्ज (IDFC First Bank Loan – Education Loan)
शिक्षणासाठी भारतात आणि भारताच्या बाहेर एकूण 34 हजार कोर्स साठी आयडीएफसी फर्स्ट बँक कर्जाचा पुरवठा करते आकर्षक व्याजदरावर आयडीएफसी फर्स्ट बँक कर्ज देऊ करते, विनातारण 50 लाखापर्यंत आयडीएफसी फर्स्ट बँक शैक्षणिक कर्ज देते. अत्यंत आणि सोप्या पद्धतीने कर्जाचा निपटारा करून बँक लवकरात लवकर कर्ज अकाउंटला ट्रान्सफर करते.
या बँके मार्फत जास्तीत जास्त एक करोड पर्यंत तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता आणि 50 लाखापर्यंत विनातारण कर्ज तुम्ही घेऊ शकता, तुमच्या एकूण खर्च जास्त 100% कर्ज बँक पुरवते पंधरा वर्षांमध्ये या कर्जाची परतफेड तुम्हाला करणे आवश्यक असते U/s 80E अंतर्गत इन्कम टॅक्स बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळतो.
तुम्ही भारतीय नागरिक आवश्यक आहे तुमचं वय 18 वर्षात माझ्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहात त्याविषयी संपूर्ण माहिती बँकेला देणे गरजेचे असेल. अर्ज करते वेळेस लागणारे संपूर्ण कागदपत्राची यादी आयडीएफसी बँकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ठेवलेले आहे ती पाहून तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.
कार लोन (IDFC First Car Loan)
आयडीएफसी फर्स्ट बँक नवीन कार घेण्यासाठी आणि जुनी कार घेण्यासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते, कार लोन साठी आयडीएफसी फर्स्ट बँक 9 टक्के एवढे व्याजदर आकारते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या कर्जाची परतफेड तुम्हाला करायचे असते., ऑन रोडच्या शंभर टक्के फंडिंग तुम्हाला आयडीएफसी बँक देते.
लोन करण्यासाठी कोणतेही शुल्क बँक आकारत नाही त्यामुळे तुम्हाला जर कर्ज (IDFC First Bank Loan) लवकर बंद करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकायचा आहे, त्यानंतर काही वेळामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी संपर्क करतील आणि तुमची प्रक्रिया पूर्ण करून घेतील.
हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, सध्याचे पगार पत्र, फॉर्म 16 किंवा मागच्या वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न, मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि डीलर कडून परफॉर्म किंवा कागदपत्रे घेणे आवश्यक असते.
हि बँक वरील सर्व कर्ज आणि सुविधा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना देते याविषयीचे संपूर्ण माहिती तुम्ही https://www.idfcfirstbank.com/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता आवश्यकता असल्यास तुम्ही त्या त्या कर्जाच्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.