IDBI Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

IDBI Bank Loan : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी आयडीबीआय बँकेच्या संपूर्ण भारतभर दहा हजाराच्या जवळपास शाखा कार्यरत आहेत, खेड्यापाड्यात आणि शहरी भागात सुद्धा आयडीबीआय बँकेच्या भरपूर शाखा आहेत ही बँक विविध व्यावसायिक क्षेत्रामध्ये व खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करते.

या बँके अंतर्गत विविध सुविधा ऑनलाईन पद्धतीने पुरवल्या जातात या बँकेचे ऑनलाईन खाते सुद्धा तुम्ही काढू शकता सॅलरी अकाउंट, बचत खाता, चालू खात, जॉईंट खात, महिलांसाठी बचत खाते/चालू खाते, पेन्शनसाठी बचत खाते असे वेगवेगळ्या सुविधा आयडीबीआय बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी देते.

ही बँक खाते उघडल्यावर त्याचे व्यवहार करणे याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा पुरवठा सुद्धा करते. या बँक अंतर्गत तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये कॅपिटल मार्केटमध्ये नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये आणि विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. या बँकेअंतर्गत फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, पीपीएस, ईसीएस यादरम्यानच्या सुविधा सुद्धा पुरवल्या जातात.

वरील सर्व सुविधा व्यतिरिक्त ही बँक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज (IDBI Bank Loan) सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना देते या कर्जामध्ये गृह कर्ज, ऑटो लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन, लोन अगेन प्रॉपर्टी अँड लोन अगेन सेक्युरिटी ही सुविधा सुद्धा आयडीबीआय बँक सर्वसामान्य नागरिकांना देते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुद्धा बँक कर्जाचा पुरवठा करते या बँकेचे प्रमुख पाच कर्ज आहेत ज्यामध्ये शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज व वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो या सर्व कर्ज विषयीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ते संपूर्ण माहिती पाहून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता.

गृह कर्ज (IDBI Home Loan)

आयडीबीआय बँक अति जलद गतीने आणि कमीत कमी व्याजदरात कोणतेही प्रक्रिया शुल्क न घेता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जदारांना कर्जाचा पुरवठा करते, ही बँक नवीन घर घेण्यासाठी, घरासाठी जागा घेण्यासाठी, जागा असेल तर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आणि गृह कर्जाचा ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा कर्जाचा पुरवठा करते.

जास्तीत जास्त तीस वर्षपर्यंत या बँकेचे गृह कर्ज तुम्ही फेडू शकतात 75 लाखापर्यंत ही बँक गृह कर्ज (IDBI Bank Loan) सर्वसामान्य नागरिकांना देते या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही जर पगारदार वर्गातून येत असाल तर कमीत कमी वय 22 वर्षे असाव तुम्ही व्यवसायिक असाल तर कमीत कमी होय 25 वर्ष असणा आवश्यक आहे.

त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला जोडायला लागतील या कागदपत्रांमध्ये तुमचा अलीकडच्या कालाकाळातील फोटो, ओळखीचा व पत्त्याचा पुरावा, मागच्या तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि मागच्या वर्षीचे फॉर्म 16 किंवा आयटीआर जोडणे बंधनकारक असेल.

ऑटो लोन (IDBI Bank Loans – Auto Loan)

ऑटो लोन अंतर्गत आयडीबीआय बँक वाहन कर्जासाठी प्रचलित आहे, गाडीच्या ऑन रोड किमतीच्या 100% पर्यंत ही बँक सर्व सामान्यांना कर्ज देते. जास्तीत जास्त सात वर्षेपर्यंत तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता. आकर्षक व्याज दारावर आयडीबीआय बँक पगारदार वर्गांना आणि व्यवसायिकांना वाहन कर्ज देते.

पगारदार वर्गातून येत असेल तर वार्षिक उत्पन्न कमीत कमी 2 लाख 40 हजार असणे आवश्यक आहे आणि तुमचे वय 18 ते 70 च्या दरम्यान असतील तर तुम्हाला आयडीबीआय बँक वाहन घेण्यासाठी कर्ज (IDBI Bank Loan) देऊ करते. हे कर्ज सुद्धा आयडीबीआय बँकेचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता.

ही कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्याचा पुरावा, तसेच वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, बँकेचे स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे जोडावे लागतील अर्ज तीन सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता सर्वप्रथम तुमची माहिती तुम्हाला भरायची आहे, तुमची पात्रता तपासायची आहे आणि कागदपत्रे अपलोड करायचे आहेत हे सर्व प्रोसेस केल्यानंतर आयडीबीआय बँक वाहन कर्ज देऊ करते.

शैक्षणिक कर्ज (IDBI Bank Education Loan)

आयडीबीआय बँक आय लर्न सुविधा अंतर्गत शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते यामध्ये विद्यालक्षमी पोर्टल अंतर्गत सुद्धा तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता, वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. फ्लेक्झिबल टेनर मध्ये आकर्षक व्याजदर सह बँक शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते.

आयडीबीआय बँक शैक्षणिक कर्ज (IDBI Bank Loan) योजनांचा संपूर्ण तपशील तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर बघू शकता सेंट्रल इंटरेस्ट सबसिडी स्कीम आणि एज्युकेशन लोन पडो प्रदेश स्कीम, एज्युकेशन लोन डॉक्टर आंबेडकर सेंटर स्कीम ऑफ इंटरेस्ट सबसिडी या सरकारच्या योजनेअंतर्गत आयडीबीआय बँक शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते.

वैयक्तिक कर्ज (IDBI Bank Personal Loan)

आयडीबीआय बँक गरजेच्या वेळेस, मेडिकल इमर्जन्सीला, घर बांधणी करण्यासाठी, ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, लग्न करण्यासाठी, अर्जंट एज्युकेशनल कामासाठी, तसेच हॉस्पिटल साठी पगारदार वर्गांना, पेन्शनर वर्गातील अर्जदारांना वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.

आयडीबीआय बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे दरवर्षी 01 लाख 80 हजार पर्यंत पगार येणे आवश्यक आहे कमीत कमी वय तुमचे 21 ते 60 वर्षे पर्यंत असणे गरजेचे असते तुम्ही जर पेन्शनर जास्तीत जास्त 75 वर्ष पर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. हे कर्ज 12 महिने ते 60 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला परत फेडायचे असते.

या कर्जाच्या अमाऊंट 25 हजारापासून 5 लाखापर्यंत तुम्हाला मिळू शकते फिक्स इंटरेस्ट असलेल्या यासाठी 1% एवढा प्रक्रिया शुल्क आयडीबीआय बँक लावते, तुम्हाला लोन (IDBI Bank Loan) परतफेड करायचे असेल तर त्याचे सुद्धा चार्जेस या बँकेमार्फत लावले जातात. दोन वर्षानंतर कोणते चार्जेस बँक लावत नाही.

अर्ज करायचा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही अर्ज करू शकता, त्यांच्या शाखेला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमची माहिती भरून तो मेसेज पाठवून तुम्ही बँकेकडून कॉल सुद्धा अरेंज करू शकता. जर तुम्हाला आयडीबीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर खाली लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

तारण कर्ज (IDBI Mortgage Loan)

आयडीबीआय बँक लोन अगेन्स प्रॉपर्टी मध्ये मोर्गेज लोन सर्वसामान्यांना देऊ करते या लोनचा पर्पज जे आहे ते आहे शैक्षणिक आवश्यकता, घर खरेदी करण्यासाठी, मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी हे कर्ज (IDBI Bank Loan) सर्वसामान्यांना पुरवले जाते, हे कर्ज दहा करोड पर्यंत दिले जात आणि हे कर्ज पंधरा वर्षाच्या आत मध्ये तुम्हाला फेडायचं असत.

यासाठी अर्जदाराचा अलीकडच्या काळातील फोटोग्राफ, रहिवासी पुरावा, मागच्या तीन महिन्याचे पगार पत्रक, मागच्या वर्षीचा आयटीआर किंवा फॉर्म 16, मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आणि प्रॉपर्टी रिलेटेड कागदपत्र तुम्हाला तिथं ठेवावे लागते. या बँकेत तुम्हाला मोर्गेज लोन साठी अर्ज करायचा असेल तर सोप्या तीन स्टेप मध्ये तुम्ही अर्ज करू शकता.

ज्यात तुमची बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे, तुमची पात्रता तुम्हाला तपासायची आहे आणि तुमचे कागदपत्र येथे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. इतर माहिती तुम्हाला हवे असेल तर त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही पाहू शकता. https://www.idbibank.in/ हे आयडीबीआय बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे याच्यावर लोन विषयीचे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याला लागणारे चार्जेस त्याचा व्याजदर वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्गेज लोन याचे सुद्धा माहिती संकेतस्थळावर तुम्हाला मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *