ICICI Bank Loans : जागतिक बँके अंतर्गत 1955 मध्ये आयसीआयसीआय या बँकेची स्थापना झाली,भारतामध्ये ही बँक सर्वप्रथम व्यावसायिकासाठी कर्ज योजना किंवा इतर सुविधा पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आली होते कालांतराने ग्राहक वाढत गेले, आयसीआयसीआय बँक तशी प्रायव्हेट सेक्टर मध्ये येऊ लागली.
1994 साली आयसीआयसीआय बँक पूर्णता खाजगी क्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून स्थापन झाली 1999 मध्ये आयसीआयसीआय बँक न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंद करणारी एकमेव भारतीय बँक होती,आयसीआयसीआय बँके अंतर्गत त्यांच्या विविध कंपन्या सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पुरवतात.
विमा, म्युचल फंड, बचत खाते, चालू खाते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आयसीआयसीआय बँक मार्फत दिले जाते. शहरी भागामध्ये विस्तारलेल्या या बँके अंतर्गत विविध प्रकारचे कर्ज (ICICI Bank Loans) दिले जातात. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज, शैक्षणिक कर्ज, कृषी कर्, त्यानंतर सोनेतारण कर्ज सुद्धा या बँके अंतर्गत तुम्हाला मिळू शकते.
या बँका अंतर्गत ज्या सुविधा दिल्या जातात त्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता सर्व प्रकारच्या ऑनलाइन सुविधा आयसीआयसीआय बँकेअंतर्गत त्यांच्या ग्राहकांना पुरवल्या जातात, तुम्ही जर आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर त्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन सर्व माहिती देऊ शकता.
ऑनलाइन पद्धतीने बचत खाता काढण्यापासून ऑनलाईन पद्धतीने कर्ज घेण्यापर्यंत सर्व व्यवस्था बँकेने आपल्या संकेतस्थळावर केलेली आहे या बँकेमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा व्यतिरिक्त ही बँक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सुद्धा देते.
त्यातील काही महत्त्वाचे कर्ज खाली दिलेले आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेमधून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन संपूर्ण माहिती घेऊन कर्ज घेऊ शकता.
वैयक्तिक कर्ज (ICICI Bank Personal Loan)
आयसीआयसीआय बँके अंतर्गत कमीत कमी व्याजदरावर 12 महिन्यापासून 72 महिन्यापर्यंतच्या परताव्यासह वैयक्तिक कर्ज दिले जाते, वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या अर्ज करू शकता. कमीत कमी कागदपत्रे कोणतेही तारण न ठेवता तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
हे कर्ज घेते वेळेस तुम्हाला मागच्या तीन महिन्याचे पगार पत्रक, मागचे तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि एक ओळखीचा पुरावा देण गरजेचं असतं या व्यतिरिक्त गरज पडल्यास बँक तुमच्याकडे इतर कागदपत्राची मागणी करू शकते. हे कर्ज (ICICI Bank Loans) घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी वीस वर्षे असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुम्ही भारतीय नागरिकांचा सुद्धा गरजेचा आहे.
हे कर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच तुम्ही कशा पद्धतीने कर्ज घेऊ शकता याची सुद्धा माहिती त्यांनी संकेतस्थळावर दिलेली आहे.
गृह कर्ज (ICICI Bank Loans – Home Loan)
आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी आयसीआयसीआय बँकेकडून तुम्ही फक्त पाच स्टेप मध्ये गृह कर्ज मिळवू शकता विविध प्रकारचे गृह कर्ज दिले जाते, यामध्ये एक्सप्रेस होम लोन, लँड लोन,होम लोन बॅलन्स ट्रान्सफर, होम लोन मनी सेव्हर ,होम लोन टॉप ऑफ होम लोन इत्यादीचा समावेश आहे.
आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यादी तसेच त्याची प्रोसेस बँकेने संकेतस्थळावर संपूर्णरित्या सांगितलेली आहे, बँकेच्या संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर होम लोन (ICICI Bank Loans) हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या साधी माहिती भरायची आहे त्यानंतर तुमची पात्रता तपासायची आहे.
पात्रता तपासल्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागेल कागदपत्र अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर तुमचं कर्ज सॅंक्शन होते, एकदम साध्या प्रोसेसने तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून गृह कर्ज घेऊ शकता.
कार लोन (ICICI Bank Car Loan)
गाडीचे 100% ऑनलाईन फंडिंग करणारे आयसीआयसीआय एकमात्र बँक आहे कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि अति जलद गतीने चार चाकी वाहनासाठी ही बँक कर्जाचा पुरवठा करते, हे कर्ज तुम्ही आठ वर्षांमध्ये परतफेड करू शकता. सोप्या चार स्टेप मध्ये हे कर्ज तुम्ही मिळू शकतात.
त्यामध्ये तुम्हाला कार सिलेक्ट करायचे आहे तुमचं लोन (ICICI Bank Loans) कस्टम करायचे आहे, वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि लोन सॅंक्शन करून घ्यायचा आहे, हे लोन मिळाल्यानंतर तुम्ही गाडी सहज घरी आणू शकता याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने सहजरित्या अर्जं करू शकता.
दुचाकी कर्ज (ICICI Bank Loans for Two Wheeler)
तुम्हाला दुचाकी घ्यायची असेल,सुपर बाईक घ्यायची असेल तर कमीत कमी कागदपत्रांमध्ये आयसीआयसीआय बँक तुम्हाला कर्जाचा पुरवठा करते, फ्लेक्झिबल EMI सह 48 महिन्याच्या आत तुम्ही गाडीचा EMI भरून तुमची गाडी स्वतःच्या मालकीची करू शकता, कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला दुचाकी घेऊ शकता.
इलेक्ट्रिक दुचाकी वर सुद्धा आयसीआयसीआय बँक कर्जाचा पुरवठा करते सोप्या चार स्टेप मध्ये तुम्ही कर्ज मिळवू शकता यामध्ये तुम्हाला दुचाकी निवडायचे आहे, लोन कस्टम करायच आहे, तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि लगेच लोन सॅंक्शन करून घ्यायचा आहे.
चार स्टेप मध्ये तुम्ही दुचाकीचे कर्ज घेऊ शकता दुचाकीचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असल्या कागदपत्राची यादी संकेतस्थळावर पाहू शकता आणि मिनिमम डॉक्युमेंटेशन असल्यामुळे तुम्हाला जास्त कागदपत्र सुद्धा इथे भरायची गरज पडत नाही, इन्स्टंट आहे डिजिटल रित्या आयसीआयसीआय बँक दुचाकी लोन सॅंक्शन करून तुम्हाला देते.
शैक्षणिक कर्ज (ICICI Education Loan)
भारताबाहेर किंवा भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी आयसीआयसीआय बँक दोन करोड रुपये पर्यंत कर्जाचा पुरवठा करते, यामध्ये कमीत कमी 16 वय असणाऱ्या अर्जदार आणि मागचं शैक्षणिक रेकॉर्ड व्यवस्थित असलेल्या अर्जदार तिथे कर्ज घेऊ शकतात.
ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा पीजी डिप्लोमा साठी सुद्धा तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकता यासाठी तुम्हाला बारावीचा रिझल्ट, ऍडमिशन कन्फर्म केल्याचे डिटेल्स, इंट्रेन्स एक्झाम असेल तर त्याचे माहिती आणि प्रे ऍडमिशन तुम्हाला द्यायला लागेल.
तुम्ही गॅरेंटर म्हणून आई-वडील, भाऊ, बहीण, नवरा किंवा बायको सुद्धा ठेवू शकता, सेक्युरिटी म्हणून तुम्हाला प्रॉपर्टी ठेवायचे असते ज्यामध्ये घर, फ्लॅट, फिक्स डिपॉझिट किंवा जर बँकेचे तुम्ही जुने कस्टमर असेल तर क्रॉस कॉलर लोन (ICICI Bank Loans) तुम्ही घेऊ शकता. अर्ज करते वेळेस दोन पासपोर्ट साईज फोटो, बारावीची मार्कशीट, ऍडमिशन लेटर, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आणि मागच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 तुम्हाला जमा करायला लागतो.
हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने लोन तुम्ही घेऊ शकता ऑनलाइन पद्धतीने लोन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्व लोन पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.
सोनेतारण कर्ज (ICICI Bank Loans – Gold Loan)
तुमच्या फायनान्शिअल गरज पूर्ण करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेकडून सोने तारण ठेवून तुम्ही रक्कम मिळू शकतात कोणत्या हप्त्याचे बर्डन नाही, डिजिटल म्हणजे ऑनलाइन पद्धतीने लोन रिन्यूअल सुद्धा तुम्ही करू शकता, पाच हजार पेक्षा जास्त शाखेमध्ये गोल्ड लोन ची पर्याय उपलब्ध आहेत.
वेगळी टीम आयसीआयसीआय बँकेने ठेवलेली आहे गोल्ड लोन सुद्धा सोप्या चार स्टेप मध्ये तुम्ही घेऊ शकता जवळच्या ब्रांचला आपलं सोनं घेऊन जायचं आहे, सोन्याची क्वालिटी चेक करायचे आहे, कागदपत्रे सबमिट करायचे आहे आणि लोन मिळवायचा आहे. एक करोड रुपया पर्यंत सोनेतारण कर्ज आयसीआयसीआय बँक म्हणून तुम्हाला दिले जाते.
सोप्या पद्धतीने कागदपत्रे हाताळून आकर्षक व्याजदरासह आयसीआयसीआय बँक तुम्हाला सोनेतारण कर्ज देते वर दिलेल्या कर्जाव्यतिरिक्त आयसीआयसीआय बँक इतर प्रकारचे सुद्धा कर्ज देते तुम्ही संपूर्ण माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता आयसीआयसीआय बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.icicibank.com/ ला भेट देऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.