Federal Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Federal Bank Loan : फेडरल बँक युवर परफेक्ट बँकिंग पार्टनर या ब्रीदवाक्यसह बँक भारतभर कार्यरत आहे अगदी चांगल्या प्रकारचा अनुभव देणारी एकमेव बँक म्हणून फेडरल बँकेला तुम्ही पाहू शकता, फेडरल बँकेचे विविध कर्मचारी वर्ग आणि फेडरल बँकेच्या सुविधा पाहता अगदी चांगली बँक म्हणून तुम्ही फेडरल बँकेची निवड करू शकता.

फेडरल बँकेचे जास्तीत जास्त काम ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे आपल्याला बँकेमध्ये दहा वेळा जाऊन चकरा मारायची गरज पडत नाही, तुम्हाला खात जरी उघडायचा असेल तर सहजरीत्या बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुमचं बचत खाते तुम्ही उघडू शकता आणि खास म्हणजे हे खातं झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे.

या बँकेमध्ये खात उघडणे व्यतिरिक्त इतर सुविधा सुद्धा दिल्या जातात ज्यामध्ये सॅलरी अकाउंट, पर्सनल अकाउंट, डोमेस्टिक अकाउंट, चालू खातं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स, गोल्ड बॉंड, डिमॅट अकाउंट हे सुद्धा हे बँक आपल्याला देऊ करते तसेच विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा केला जातो.

ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, (Federal Bank Loan) कार लोन, गृह कर्ज, मालमत्ता कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी कर्जाचा पुरवठा विभाग करते या बँके अंतर्गत या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे कर्ज दिले जातात.

ज्यामध्ये डिजिटल पर्सनल लोन, पर्सनल लोन आणि इतर कर्जाचा समावेश होतो हे कर्जाची सविस्तर माहिती खाली दिलेल्या आहे बँकेचे मुख्य कर्ज आहेत त्याविषयीची माहिती तुम्ही खाली पाहू शकता आणि जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही या कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.

वैयक्तिक कर्ज (Federal Bank Personal Loan)

तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर फेडरल बँक एकदम चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो फेडप्रीमिया, प्रे अँप्रोव्हड पर्सनल लोन आणि डिजिटल पर्सनल अंतर्गत तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे प्रे अँप्रोव्हड संधी असेल तर तुम्ही हे कर्ज सहजरीत्या घेऊ शकता.

फेडरल बँकेचे कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 25 हजार एवढी दर महिना सॅलरी आवश्यक आहे, जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि हे (Federal Bank Loan) कर्ज 60 महिन्यामध्ये फेडू शकता. आकर्षक व्याजदरासह संपूर्ण बँकेमध्ये कमीत कमी कागदपत्रात आणि जलद गतीने वैयक्तिक कर्ज देणारी फेडरल बँक एकमेव बँक आहे.

तुमचा पगार 25000 पेक्षा जास्त असेल तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्ही ज्या ठिकाणी कामाला आहात तिथे तीन वर्ष झाले असेल तर तुम्ही या बँकेचे कर्ज घेऊ शकतात कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे.

उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी सर्टिफिकेट मागच्या तीन महिन्याच्या फॉर्म 16 बँकेच्या सॅलरी अकाउंट ची स्टेटमेंट आणि लोन ऍप्लीकेशन भरून तुम्ही ते कर्ज घेऊ शकता.

कार कर्ज (Federal Bank Loan – Car Loan)

तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कार घेण्याच्या असेल तर फेडरल कार लोन तुम्हाला कर्जाचा पुरवठा केला जाऊ शकतो,100% फंडिंग तुम्हाला या बँकेकडून मिळू शकते हे पैसे तुम्ही 84 महिन्यांमध्ये फेडायचे असतात इतर बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी व्याज तुम्हाला बँकेकडून मिळते.

दहा लाखापर्यंत पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स सुद्धा इथे तुम्हाला मिळतो ठरवलेल्या कालावधीपेक्षा अगोदर कर्ज फेडायचे असेल तर येथे कोणतेही चार्जेस ही बँक घेत नाही. तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात.

या बँकेचा व्याजदर 8.85% चालू होते जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर जुनी गाडी घेत असाल तर 16.30% एवढा व्याजदर हे बँक आकारते, वेगवेगळ्या प्रकारच्या टर्म कंडिशन या बँकेच्या साईटवर दिलेल्या आहेत त्या पाहून तुम्ही कर्जासाठी (Federal Bank Loan) अर्ज करू शकता तर त्यांनी लिंक दिलेली आहे,त्या लिंक वर जाऊन तुम्हाला नाव मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला बँके कडून कर्जासाठी कॉल येईल.

गृह कर्ज (Federal Bank Home Loan)

नवीन घर घेण्यासाठी,फ्लॅट घेण्यासाठी, जागा असेल तर घर बांधण्यासाठी आणि घराच्या सजावटीसाठी फेडरल बँकेतर्फे आकर्षक व्याजदरवर कर्जाचा पुरवठा केला जातो, तुम्ही जर नवीन घर घेऊ इच्छित असाल तर एकरकमी आपल्याला रक्कम भरणे अवघड जातं त्यामुळे आपण गृह कर्ज घेण्याचा विचार करतो.

पंधरा लाखाच्या वर दीड कोटी पर्यंत ही बँक कर्ज देऊ करते घराचे एकूण रकमेच्या 85 टक्के रक्कम बँक कर्ज म्हणून तुम्हाला देऊ शकते 360 महिन्यांमध्ये हे कर्ज तुम्हाला परतफेड करायचे असते. यामध्ये तुम्हाला टॉप-अप लोन सुद्धा उपलब्ध आहे आणि कमीत कमी प्रक्रिया शुल्कासह फेडरल बँक तुम्हाला गृह कर्ज देते.

गृह कर्ज घ्यायचा असेल तर तुमचं 50000 एवढं उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय जास्तीत जास्त 55 वर्ष असेल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. या बँकेचे ईएमआय तुम्ही चेक ने ऑनलाइन किंवा ECS ने भरू शकता या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता,या बँकेचे व्याजदर 8.80% पासून सुरू असून तुमच्या क्रेडिट हिस्टरी नुसार या बँकेचे व्याजदर बदलत असते.

सोनेतारण कर्ज (Federal Bank Loan – Gold Loan)

फेडरल बँक बावीस कॅरेटच्या सोन्यावर गहाण ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज तुम्हाला देते एक लाखापासून दीड करोड पर्यंत ही बँक सोनेतारण कर्ज देते, अगदी जलद गतीने सोनेतारण कर्जाचे प्रोसेस करते, कमीत कमी व्याजदर या बँकेचा आहे आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला या बँकेचे सोनेतारण कर्ज मिळू शकते.

कोणीही सोनेतारण कर्ज (Federal Bank Loan) काढू शकतो यासाठी कोणत्याही सिबिलची किंवा क्रेडिट ची गरज पडत नाही व्यवसायासाठी, स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी किंवा इतर करण्यासाठी तुम्ही सोनेतारणकर्ज घेऊ शकता, सोनेतारण कर्ज घेताना तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, पत्त्याचा पुरावा, आणि ओळखीचा पुरावा द्यावा लागतो.

ही बँक डोअर स्टेप सोनेतारण कर्जाचा पर्याय तुमच्याकडे ठेवते ऋतिक फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ही बँक संपूर्ण भारतभर सोनेतारण कर्ज पुरविते, बँक फक्त एका कंपनी मार्फत नसून वे गवेगळ्या कंपन्या मार्बल सोनेतारण कर्ज ग्राहकांना देत असते.

या बँकेचे सोनेतारण कर्ज तसेच वर दिलेली इतर (Federal Bank Loan) कर्ज तुम्हाला घ्यायच्या असतील त्याची माहिती जर पाहिजे असेल तर फेडरल बँकेचे अधिकृत वेबसाईट https://www.federalbank.co.in/ वर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता सगळी माहिती घेऊन यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *