DCB Bank Loan
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

DCB Bank Loan : डीसीबी बँक हे भारतातील खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँक आहे रिजर्व बँकेने या बँकेला 31 मे 1995 रोजी परवाना दिला या बँकेच्या 31 मार्च 2022 पर्यंत संपूर्ण भारतभर 407 शाखा आहेत आणि भारताच्या सर्व ठिकाणी ही बँक कार्यरत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर सुद्धा बँक रजिस्टर असून भारतीय रिझर्व बँकेने 1995 मध्ये शेड्युल बँकेचा परवाना दिला.

या बँकेला विविध प्रकारचे पुरस्कार आतापर्यंत मिळालेले असून त्या विषयाची माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता डीसीबी बँक चालू खाता, बचत खाता, आवर्ती ठेव, विमा, गुंतवणूक तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड तसेच ऑनलाइन पद्धतीच्या इतर सेवा सुद्धा पुरवते.

डीसीबी बँकेअंतर्गत तुम्ही विविध खाते काढू शकतात सोबतच विविध प्रकारचे कर्ज सुद्धा घेऊ शकता या बँक मध्ये खाते उघडणे किंवा कर्ज काढणे अगदी ऑनलाईन पद्धतीने होत तुम्ही या बँकेमधून म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता. तुमच्या सेविंग वर आठ टक्के पर्यंत व्याजदर दिले जाते.

या सर्व सुविधा व्यतिरिक्त डीसीबी बँक तुम्हाला वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज (DCB Bank Loan) आणि कृषी कर्ज सुद्धा देते तुम्हाला पैशाची आवश्यकता असल्यानंतर तुम्ही डीसीबी बँकेचे ग्राहक असेल तर सहजरीत्या कर्जाची उपलब्धता तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही डीसीबी बँकेचे ग्राहक नसाल तरी बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

यासाठी तुमचा डिटेल्स तुम्हाला तिथे भरावे लागते ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या सुविधा असून तुमचा अर्ज कोणत्या सिच्युएशनला आहे कोणत्या स्टेजला आहे याची माहिती तुम्ही ट्रॅक युवर लोन ॲप्लिकेशन मध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता या बँके अंतर्गत विविध कर्जाचा पुरवठा केला जातो काही कर्जाविषयी खाली सविस्तर माहिती दिलेले आहे ते सविस्तर माहिती पाहून तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही या बँके कडून हे कर्ज घेऊ शकता.

गृह कर्ज (DCB Bank Home Loan)

डीसीबी बँक घराच्या एकूण रकमेच्या 90% एवढी रक्कम तुम्हाला कर्ज देते कमीत कमी दहा लाख व जास्तीत जास्त पाच करोड पर्यंत कर्ज देते, यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर तिथे देऊन एक्झिक्युटीव्ह तुम्हाला कॉल करतील ही फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध असेल.

लवकरात लवकर कर्जाचा पुरवठा हे बँक करते त्यासोबतच आकर्षक व्याजदर सुद्धा ही बँक तुम्हाला देऊ करते गृह कर्ज (DCB Bank Loan) साठी कोणते कागदपत्रे लागतील याच्या विषयीची माहिती आणि त्याची पीडीएफ बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेली आहे.

सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या बघून तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतील आणि तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तुमचा पगार त्यांच्या पात्रतेनुसार असेल तर तुम्ही या बँकेचे गृह कर्ज घेऊ शकता.इतर बँकेचे कर्ज तुम्ही घेतले असेल तर कर्ज तुम्ही या बँकेत ट्रान्सफर सुद्धा करू शकता.

कार लोन (DCB Bank Loan – Car Loan)

डीसीबी कार लोन अंतर्गत तुम्ही कारच्या 90% पर्यंतचे कर्ज घेऊ शकता आणि हे कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 7 वर्षांमध्ये फेडू शकता जास्तीत जास्त कर्जाची अमाउंट तीस लाखापर्यंत आहे. सहजरित्या लवकरात लवकर होणार कर्ज म्हणजे डीसीबी बँकेचे कार लोन.

वैयक्तिक वापरासाठी, कंपनीच्या वापरासाठी किंवा व्यवसायासाठी जर तुम्ही वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमचं वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असण आवश्यक असणार आहे. यासाठी तुम्हाला अलीकडच्या काळातला पासपोर्ट साईज फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, बँकेचे सहा महिन्याचे स्टेटमेंट, तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप , दोन वर्षाचे आयटी रिटर्न बँकेकडे सादर करायला लागते.

या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता डीसीबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सर्व माहिती आहे खाली याच लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते कर्ज घेऊ शकता.

व्यावसायिक कर्ज (DCB Bank Business Loan)

डीसीबी बँक व्यवसायासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देते ज्यामध्ये मायक्रो बिजनेस लोन, गोल्ड लोन, कमर्शियल व्हेईकल लोन, वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन आणि ट्रेड फायनान्स अंतर्गत व्यावसायिकासाठी कर्जाचा पुरवठा करते.

या सर्व कर्जाचे व्याजदर सुद्धा वेगवेगळे असून यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्राची यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळू शकते वेगवेगळ्या सहा ते सात योजना अंतर्गत डीसीबी बँक व्यावसायिक कर्ज पुरवते जर तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी किंवा व्यवसायामध्ये आवश्यक असलेल्या मशीन, जमीन घेण्यासाठी जर कर्जाची गरज असेल तर डीसीबी बँकेचा पर्याय तुम्ही वापरू शकता.

डीसीबी टर्म लोन (DCB Bank Term Loan)

मध्ये तुम्ही तुमची असलेली संपत्ती गहाण ठेवून बँकेकडून कर्ज (DCB Bank Loan) सुद्धा घेऊ शकता इतर कामासाठी आणि ते व्यवस्थित रित्या तुम्ही जर परतफेड केली तर पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कर्ज मिळू शकते, डीसीबी बँक शेतकऱ्यांसाठी सुद्धा तेवढेच फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी फार्मर लोन, मायक्रो फायनान्स लोन, एमएसएमई वर्किंग कॅपिटल लोन, मायक्रो इंटरप्राईज लोन, वेअर हाऊस कन्स्ट्रक्शन डीलर, ट्रेड ॲडव्हान्स या योजनेअंतर्गत विविध कर्जाचा पुरवठा करते.

कृषी कर्ज (DCB Bank Loan – Agri Loan)

डीसीबी बँकेकडून तुम्ही तुमच्या शेतजमीनवर कर्ज घेऊ शकता तुम्हाला वेअर हाऊस किंवा गोडाऊन बांधायचा असेल तर त्यासाठी सुद्धा डीसीबी बँकेकडून तुम्हाला विविध प्रकारचे कर्ज घेऊ शकणार आहात. डीसीबी बँकेच्या नॉन मायक्रो फायनान्स लोन अंतर्गत तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर कमीत कमी तीन लाख रुपये एवढं कर्ज तुम्ही घेऊ शकता आणि जास्तीत जास्त सहा लाखापर्यंत हे कर्ज तुम्हाला मिळू शकते.

25% एवढा व्याजदर याचा असेल जर तुम्हाला कर्ज (DCB Bank Loan) काढायचं असेल तर 22 ते 65 वर्षात दरम्यान तुमचं वय असणार गरजेचा आहे त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र व इतर माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.

विविध प्रकारचे कर्ज व इतर सुविधा सुद्धा डीसीबी बँक सर्वसामान्य ग्राहकांना कमीत कमी व्याज दारात आणि चांगल्या स्वरूपात देत असते जर तुम्हाला डीसीबी बँकेच्या संकेतस्थळावर जायचं असेल तर https://www.dcbbank.com/ हे तुम्हाला टाईप करायचे आहे आणि त्यानंतर लोन च्या सेक्शन मध्ये जाऊन संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि आवश्यक असल्यास अर्ज करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *