City Union Bank Loan : सिटी युनियन बँक तुम्ही या बँकेचा नाव ऐकलंच असेल या बँकेच्या विविध शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर कार्यरत आहेत त्या बँकेमार्फत विविध प्रकारच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी पुरवल्या जातात.
ज्यामध्ये विविध प्रकारचे बचत खाते, विविध प्रकारचे चालू खाते, नेट बँकिंग आणि इतर टेक्निकल सर्विसेस त्यासोबतच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि विमा सुद्धा दिला जातो. यामध्ये स्टार हेल्थ, टाटा AIA, बजाज Allianz, आदित्य बिर्ला, केअर हेल्थ, श्रीराम जनरल, नॅशनल पेन्शन सिस्टिम अंतर्गत हि बँक कार्य करते.
या बँकेमध्ये तुम्ही एफडी आणि आरडी सुद्धा काढू शकता सोबतच गोल्ड बॉंड सुद्धा बँकेमार्फत घेऊ शकता त्या बँकेच्या पेमेंट गेटवे अंतर्गत तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट, टॅक्स पेमेंट आणि जीएसटी पेमेंट सुद्धा करू शकता. या सर्व व्यतिरिक्त सिटी युनियन बँक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करते.
ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज, कृषी कर्ज, होम लोन आणि शैक्षणिक कर्ज पुरविले जाते वर दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे खाली सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही जर हे कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा खाली दिलेल्या लिंक करून तुम्ही भेट देऊ शकता आणि लगेच अर्ज करू शकता.
वैयक्तिक कर्ज (CUB Personal Loan)
विविध प्रकारचे वैयक्तिक कर्ज तुम्हाला दिले जाते ज्यामध्ये कमीत कमी कागदपत्रात आणि अत्यंत जलद गतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज हे बँक देऊ करते तुम्हाला या बँके बँकेमध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असेल त्या बँकेचे चार्जेस त्याच्यासाठी लागणार आहे कागदपत्र इत्यादीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या बँकेमध्ये जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्जाचा (City Union Bank Loan) पुरवठा केल्या जातो कर्जाच्या रकमेनुसार परतफेडचा कालावधी सुद्धा ठरवला जातो.
कृषी कर्ज (City Union Bank Loan – Agricultural Loan)
सिटी युनियन बँक अंतर्गत तुम्हाला एक वर्षासाठी कृषी कर्ज देऊ करते,यामध्ये सुद्धा तुम्ही कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. यासाठी 8.80 टक्के एवढा व्याजदर ही बँक आकारते.
यामध्ये पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा तुम्हाला द्यावा लागतो त्यासोबतच डिमांड प्रॉमिसरी नोट सुद्धा बँक तुमच्याकडे मागू शकते तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजे याची माहिती त्यांनी संकेतस्थळावर (City Union Bank Loan) दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहू शकता.
गृह कर्ज (City Union Bank Home Loan)
सिटी युनियन बँक अंतर्गत नवीन घर बांधण्यासाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी, घराची पुनर्रबांधणी करण्यासाठी, घर वाढवण्यासाठी, बांधकामांमध्ये असलेला फ्लॅट घेण्यासाठी किंवा इतर बँकेचे गृह कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी या लोनचा पुरवठा करते.
पगारादार वर्गासाठी तसेच व्यावसायिकासाठी ही बँक कर्जाचा पुरवठा करते जास्तीत जास्त एक करोड रुपये पर्यंत बँक गृह कर्ज देऊ करते, यासाठी 180 महिन्याचा परतफेड कालावधी ही बँक ठेवते इतर सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.
शैक्षणिक कर्ज (City Union Bank Loan – Education Loan)
देशांमध्ये किंवा बाहेर देशांमध्ये हायर एज्युकेशन घेण्यासाठी सिटी युनियन बँक सात लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा करते आणि विविध योजेने अंतर्गत या कर्जामध्ये तुम्ही टॅक्स बेनिफिट सुद्धा घेऊ शकता. ऍडमिशन घेण्याअगोदर तुमचं लोन सॅंक्शन होऊ शकते.
जर तुमची कागदपत्रे व्यवस्थित असतील तर अत्यंत कमी व्याज दारात शैक्षणिक कर्जाचा पुरवठा सीटी युनियन बँक अंतर्गत केला जातो, सिटी युनियन बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही अधिकृत शैक्षणिक संस्थेची यादी पाहू शकता यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतात.
तुम्ही सिटी युनियन बँके अंतर्गत शैक्षणिक कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर खाली लिंक केलेले आहे त्यावर जाऊन एज्युकेशन लोन हा पर्याय तुम्ही निवडून त्याच्या विषयी माहिती घेऊ शकता.
व्यवसायिक लोन (City Union Bank Business Loan)
व्यवसाय करत असताना पैशाची आवश्यकता कधीही पडू शकते अशा दरम्यान तुम्ही सिटी युनियन बँके अंतर्गत वर्किंग कॅपिटल साठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायामध्ये आवश्यक असलेल्या बिल्डिंग किंवा मशिनरी घेण्यासाठी वर्किंग कॅपिटल म्हणून कर्ज घेऊ शकता.
तुम्ही जे मशीन मध्ये घेणार असाल तर त्याच्या 75% एवढं कर्ज बँक तुम्हाला देऊ करते यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, बँकेचं स्टेटमेंट,वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन एवढा कागदपत्रे तुम्हाला लागतील.
तुमची कंपनी कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार वेगवेगळे कागदपत्र तुम्हाला लागतील जर तुम्ही प्रोप्रायटर शिप असेल तर रजिस्टर सर्टिफिकेट, सीएसटी व्हॅट, सेल्स इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. तसेच पार्टनरशिप फॉर्म साठी वेगळे कंपनीसाठी वेगळे कागदपत्र तुम्हाला लागू शकते.
जर तुम्ही अशा प्रकारचा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तुमच्या व्यवसाय वाढीसाठी कर्ज घ्यायचा विचार करत असेल किंवा इतर कोणते कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सिटी युनियन बँक हा एक तुमच्याकडे चांगला पर्याय असू शकतो. सर्व कर्ज विषयीची माहिती तुम्ही स्वीटी युनियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता https://www.cityunionbank.com/ हे या बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.