Central Bank Loan : गावामध्ये तसेच शहरी भागामध्ये सर्वाधिक शाखा असणारी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये चालू खाते, बचत खाते, कृषी कर्ज यासोबतच विविध कर्जाचा पर्याय बँके मार्फत उपलब्ध असतो. गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, तसेच सोनेतारण कर्ज घेऊ शकतात.
या बँकेमार्फत विविध प्रकारच्या कर्ज विविध व्याजदर आकारले जातात त्यासोबतच त्या कर्ज प्रकारांमध्ये विविध प्रकारच्या योजना सुद्धा बँकेमार्फत राबवल्या जातात याची सविस्तर माहिती त्या कर्जाच्या प्रकारामध्ये तुम्ही खाली पाहू शकता आणि आवश्यकता असेल तर त्याच्याखाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन माहिती घेऊन अर्ज सुद्धा करू शकता.
गृह कर्ज (Central Bank Loan – Home Loan)
सेंट्रल बँके मार्फत नवीन घर घेण्यासाठी, घराची डागडुजी करण्यासाठी किंवा घरासाठी जागा घेण्यासाठी कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. सेंट्रल बँके मार्फत सेंट गृहलक्ष्मी, सेंट होम लोन, सेंट होम डबल प्लस किंवा सेंट होम लोन स्कीम फॉर परचेसिंग आणि टॉप अप फॅसिलिटी सेंट होम लोन हे पर्याय उपलब्ध आहेत.
यामध्ये विविध प्रकारचे व्याजदर विविध प्रकारचे प्रक्रिया तुम्हाला पार पाडावे लागते महिलांसाठी सुद्धा सेंट गृहलक्ष्मी हे कर्जाचा पर्याय उपयुक्त असणार आहे ही बँक या कर्जावर खूप कमी व्याजदर आकारते.
वाहन कर्ज (Central Bank Vehicle Loan)
सेंट्रल बँकेमार्फत नवीन वाहन घेण्यासाठी कर्जाचा पुरवठा केला जातो यामध्ये गो ग्रीन वेहिकल स्कीम, कॉम्बो वेहिकल स्कीम आणि सेंट वेहिकल लोन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा वेगवेगळ्या कंपनीची Tie-Up झालेला आहे.
तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे त्या कंपनीसोबत सेंट्रल बँकेचा Tie-Up आहे की नाही हे एकदा चेक करा आणि जर Tie-Up असेल तर तुम्ही या बँकेच्या कर्जासाठी ऑनलाईन माहिती घेऊन अर्ज करू शकता, वाहन कर्जासाठी सुद्धा सेंटर बँकेचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे.
शैक्षणिक कर्ज (Central Bank Loan – Education Loan)
सेंट्रल बँकेमार्फत विविध प्रकाराच्या योजने अंतर्गत शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो यामध्ये सेंट विद्यार्थी, सेंट लोन सबसिडी स्कीम फॉर टेक, विद्यार्थी एज्युकेशन लोन हे वेगवेगळे कर्ज तुम्हाला उपलब्ध होतात.
यामध्ये तुम्ही एमबीए, इंजीनियरिंग करत असेल तर तुमच्यासाठी हे कर्ज अत्यंत उपयुक्त असणार आहे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यांचे वेबसाईट खाली दिलेली आहेत तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. खूप कमी व्याजदरामध्ये सेंट्रल बँक तुम्हाला जास्तीत जास्त 10 लाख ते 40 लाखापर्यंत कर्जाचा पुरवठा करते.
विविध योजना अंतर्गत कर्जाचे स्वरूप कर्जाचा व्याजदर व कर्जाचे रक्कम बदललेले असू शकते त्यामुळे सेंट्रल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याविषयीची माहिती घेऊ शकता.
वैयक्तिक कर्ज (Central Bank Personal Loan)
सेंट्रल बँक गावाखेड्यात उपलब्ध असून कुठेही तुम्ही या बँकेसाठी अर्ज करू शकता, बँकेमधून कर्ज घ्यायचे असेल तर कमीत कमी तुम्हाला वार्षिक 01 लाख एवढा पगार गरजेचा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत या बँक मार्फत कर्ज दिले जाते.
या बँकेचा व्याजदर तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर पाहू शकता जवळपास 01 टक्के एवढे प्रोसेसिंग शुल्क बँक आकारते त्याच्यासोबतच डॉक्युमेंटेशनचे चार्जेस बँक आकारात असल्यामुळे तुम्ही कर्ज घेण्या अगोदर या बँकेच्या वेबसाईटवरील पर्सनल लोन योजनेअंतर्गत चा पर्याय निवडून त्या विषयाची माहिती पाहू शकता, तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये परमनंट कर्मचारी असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते.
सोनेतारण कर्ज (Central Bank Loan – Gold Loan)
सेंट्रल बँकेअंतर्गत तुमच्याकडे असणाऱ्या सोन्यावर कर्ज दिले जाते वैयक्तिक अडचणीच्या वेळेस आणि एकदम गरजेच्या वेळेस आपण कधीतरी सोने ठेवून त्या सोन्याच्या बदल्यात पैसे घेतो याला सोनेतारण कर्ज असं म्हटलं जातं. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत सोनेतारण कर्ज पर्याय उपलब्ध आहे.
22 कॅरेट असलेलं सोन जास्तीत जास्त 50 ग्रॅम ठेवून तुम्ही बँके कडून कर्ज घेऊ शकता कधीही सोन्याच्या कर्जाचे रक्कम देऊन तुम्ही या बँकेचे कर्ज फेडू शकता आणि तुमच्या सोने परत घेऊ शकता.
या बँकेमार्फत कमीत कमी 10 हजार जास्तीत जास्त 40 लाखापर्यंतचा सोनेतारण कर्ज (Central Bank Loan) दिल्या जाते, बारा महिन्याच्या आत तुम्हाला या कर्जाचा परतफेड करायला लागते, त्यामुळे सोनेतारण ठेवण्याअगोदर या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जाच्या 0.50 टक्के एवढी रक्कम तुम्हाला प्रोसेसिंग फीज म्हणून आकारले जाते.
सेंट पर्सनल लोन अंतर्गत 31.12.2023 पर्यंत कोणतीही प्रोसेसिंग फीज आकारले जाणार नाहीत डॉक्युमेंटेशन साठी कोणत्या प्रकारचे चार्जेस नसणार आहे आणि यांचा व्याजदर तीन लाखासाठी 8.45% आणि तीन लाखाच्या वर आठ पॉईंट 8.55% पर्यंत व्याजदर उपलब्ध आहेत.
तुम्ही जर सोनेतारण कर्ज घेण्यास इच्छुक असेल किंवा गरज असेल तर तुम्ही बँकेला जाऊन भेटू शकता आणि तिथे सोनेतारण कर्ज विषयीची माहिती घेऊ शकता.
यामधील भरपूर कर्जासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध असून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/ वर जाऊन तुम्ही कर्जाविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.