Catholic Syrian Bank Loan : 1920 मध्ये सुरू झालेल्या सीएसबी बँक केरळ मध्ये एक शाखेसोबत आपले कार्य सुरू केले 1969 मध्ये रिझर्व बॅंकेकडून सेंट्रल बँकेचा दर्जा मिळाला आणि CSB ची पहिली ब्रांच चेंबूर मुंबई येथे ओपन झाली, सध्या संपूर्ण भारतभरात सातशे चार शाखे सह आणि 534 ATM सह ही बँक 16 राज्यांमध्ये आणि 4 युनियन टेरिटरी मध्ये कार्य करते.
या बँकेच्या अकरा झोनल ऑफिस असून हेड ऑफिस मुंबई येथे आहे, या बँकेमार्फत चालू खाते, बचत खाते,लॉकर, फॉरेन एक्सचेंज, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिमॅट अकाउंट आणि गोल्डबोंड मध्ये सुद्धा काम करते. या बँकेमार्फत तुम्ही जीवन विमा, सर्वसामान्य विमा आणि हेल्थ विमा काढू शकता.
या सर्व व्यतिरिक्त बँक विविध प्रकारचे लोन देते ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज, दुचाकी वाहन कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोनेतारण कर्ज आणि छोटे व्यवसायासाठी कर्जाचा समावेश आहे, बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या कर्ज (Catholic Syrian Bank Loan) विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, सविस्तर माहिती पाहून तुम्ही या बँके कडून चांगल्या व्याजदराने कर्ज घेऊ शकता.
वैयक्तिक कर्ज (Catholic Syrian Bank Personal Loan)
ही बँक पगारदार वर्गासाठी आणि व्यावसायिकासाठी वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते, ही बँक पगारदार वर्गासाठी पर्सनल लोन देण्यास जास्त प्राधान्य देते या बँकेमार्फत तुम्ही 75 हजार ते 40 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. 12 ते 72 महिन्यांमध्ये या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकणार आहात.
या कर्जासाठी तुम्हाला कोणती सेक्युरिटी. गॅरेंटर किंवा तारण ठेवण्याची गरज नाही. मार्केट मधल्या इतर व्याजदरापेक्षा CSB बँकेचा व्याजदर तुम्हाला कमी प्रमाणात मिळू शकते. शिक्षण, हॉलिडे,मेडिकल खर्च, लग्नाचा खर्च इत्यादीसाठी तुम्ही वैयक्तिक कर्जाचा वापर करू शकता.
तुमचं वय 23 ते 60 दरम्यान असेल तर तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्ही कमीत कमी दोन वर्षे एका ठिकाणी जॉबला असणे गरजेचे आहे आणि तुमचं उत्पन्न दर महिना 15000 पेक्षा जास्त असणे आवश्यक असेल तर तुम्ही या बँके कडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
गृह कर्ज (Catholic Syrian Bank Loan- Home Loan)
घर घेणे सर्वांच स्वप्न असतं सीएसबी बँकेमार्फत सुद्धा घर घेन्यासाठी तुम्हाला 75 लाख पर्यंत कर्ज दिले जात, सीएसबी बँकेचा व्याजदर 9.69 टक्के असून 75 लाखाच्या वर 9.94% एवढा व्याजदर आकारला जातो. कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि जलद गतीने तुम्हाला गृह कर्ज सीएसबी बँक कडून मिळू शकते.
तुम्ही घर बांधण्यासाठी सुद्धा कर्ज घेऊ शकता कर्ज विषयीच्या पात्रता तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर पाहू शकता खाली त्याची लिंक दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने करायचा याची सुद्धा माहिती दिलेली आहे, जर तुम्ही गृह कर्ज घेऊन इच्छित असाल तर सीएसबी बँक तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकते.
वाहन कर्ज (Catholic Syrian Bank Vehicle Loan)
सीएसबी बँक मार्फत वैयक्तिक, इन्स्टिट्यूट किंवा कंपनीला वाहन घेण्यासाठी कमर्शियल, नॉन कमर्शियल वाहनासाठी कर्ज दिले जाते ऑन रोड किमतीच्या 80 टक्के एवढ कर्ज बँक तुम्हाला देते तुमची एलिजिबिलिटी किती आहे हे कर्ज घेण्यापूर्वी एकदा तपासणे आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला मिनिमम एक माणूस गॅरेंटर्स आवश्यक आहे, पाच वर्षापर्यंत या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकता सेक्युरिटी म्हणून तुमची गाडी त्यांच्याकडे गहाण राहणार आहे, यासाठी तुम्हाला कागदपत्रांमध्ये अलीकडच्या काळातील सॅलरी स्लिप किंवा आयटी रिटर्न चा पुरावा उत्पन्नाचा पुरावा म्हणून द्यावे लागेल.
दुचाकी वाहन कर्ज (Catholic Syrian Bank Loan – Two Wheeler)
सीएसबी बँके अंतर्गत बाईक लोन्स आणि सुपर बाईक लोन अंतर्गत तुम्ही जलद गतीने दुचाकी वाहनासाठी कर्ज घेऊ शकता, एकदम जलद आणि लवकरात लवकर प्रोसेस होणारे सीएसबी बँकेचं वाहन कर्ज तुम्हाला अधिक उपयोगी पडू शकत.
सुपर बाईक घेण्यासाठी जवळपास तीन लाखापर्यंत सीएसबी बँके अंतर्गत कर्ज दिल्या जात तुम्ही जर सीएसबी चे कस्टमर असाल किंवा महिला अर्जदार असाल तर तुम्हाला व्याजदरामध्ये सुद्धा सूट सीएसबी बँक अंतर्गत मिळते.
सोनेतारण कर्ज (CSB Gold Loan)
सीएसबी बॅंकेअंतर्गत सोनेतारण कर्जाचा पर्याय सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे, सोनेतारण कर्ज बँकेकडून तुम्ही घेऊ शकता कमीत कमी फॉर्मलिटी मध्ये आणि फ्लेक्झिबल पेमेंट मध्ये तुम्ही सोनेतारण कर्ज घेऊ शकता. कॉम्पिटिटिव्ह इंटरेस्ट रेट वर तुम्हाला सोनेतारण कर्ज सीएसबी बँक देते आणि महिला वर्गांसाठी वेगवेगळ्या स्कीम सीएसबी बँकेमध्ये आहेत.
तुम्हाला तीन महिन्याला, सहा महिन्याला आणि वर्षाला पेमेंट ऑप्शन देते त्यामुळे सोनेतारण कर्ज (Catholic Syrian Bank Loan) ठेवण्यासाठी सीएसबी बँकेचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता. इतर कर्ज सुद्धा सीएसबी बँकेकडून तुम्हाला मिळू शकतात जर आवश्यकता असेल तर संपूर्ण कर्जाची माहिती घ्यावी आणि त्यानंतर आवश्यक असलेल्या कर्जासाठी ऑनलाईन उपलब्ध असेल तर ऑनलाईन अर्ज करावा किंवा जवळच्या शाखेला जाऊन भेट द्यावी.
कमीत कमी आणि चांगल्या व्याज दारावर सीएसबी बँक तुम्हाला कर्जाचा पुरवठा करू शकते बँकेच्या अधिकृत संकेतस्थळवर जाऊन तुम्ही याविषयीची माहिती पाहू शकता, https://www.csb.co.in/ सीएसबी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.