Canara Bank Loans : सिंडिकेट बँकेसोबत कार्यरत असलेली कॅनरा बँक भारतातील राष्ट्रीयकृत बँक आहे, काही वर्षांपूर्वी सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँक मध्ये विलीन करून कॅनरा बँक हे एकच नाव ठेवण्यात आले आहे, या बँकेमध्ये बचत खाते, चालू खाते यासोबतच विविध प्रकारचे कर्ज सुद्धा उपलब्ध आहेत.
या बँकेमार्फत गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, मोर्गेज कर्ज, MSME कर्ज, कॉर्पोरेट कर्ज, कृषी कर्ज तुम्हाला दिल्या जाते. काही महत्त्वाच्या कर्जाचा खाली उल्लेख केलेला आहे, त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेले आहेत.
गृह कर्ज (Canara Bank Home Loan)
कॅनरा बँकेमार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी गृह कर्जाचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे, यामध्ये हाऊसिंग लोन, हाऊसिंग कम सोलर लोन, कॅनरा होम लोन, सुपर गेन कॅनरा कुटीर हाऊसिंग लोन,एग्रीकल्चरिस्ट होम लोन फॉर NRI या पर्याय मधून तुम्हाला आवश्यक असणारे गृह कर्ज तुम्ही बँके मार्फत मिळवू शकता.
आठ टक्क्यापासून गृह कर्जाचा व्याजदर बँकेमार्फत चालू असून कोणतेही छुपे चार्जेस बँकेमार्फत आकारले जात नाही, कमीत कमी कागदपत्रांमध्ये या बँकेचे गृह कर्ज तुम्ही घेऊ शकता.
वाहन कर्ज (Canara Bank Loans – Vehicle Loan)
कॅनरा बँके मार्फत दुचाकी, तीनचाकी, चार चाकी वाहन घेण्यासाठी कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत, शेतकरी असतील तरी यासाठी कॅनरा बँक कर्जाचा पर्याय देते. शेतकऱ्यांसाठी वेगळी स्कीम कॅनरा बँकेने वाहन कर्ज घेण्यासाठी ठेवलेले आहे या कर्जाच्या पर्यायाअंतर्गत तुम्ही कार लोन घेऊ शकता.
तुम्हाला जेवढी पात्रता असेल तेवढे लोन बँकेमार्फत मिळू शकते यामध्ये जास्तीत जास्त नवीन गाडीच्या 90% फायनान्स बँक करते, कमीत कमी प्रोसेसिंग चार्जेस इथे तुम्हाला लागतात, कमीत कमी व्याजदर सुद्धा या बँकेचा आहे त्यामुळे तुम्ही हे कर्ज सहजरित्या घेऊ शकता.
यासोबतच तुम्ही जर शेतीसाठी ट्रॅक्टर घेत असाल तर सुद्धा कॅनरा बँकेमार्फत कर्जाचा पुरवठा केला जातो, शेतकऱ्यांसाठी सुद्धा कॅनरा बँक वाहनाचा कर्जाचा पर्याय देते यामध्ये सुद्धा खूप कमी व्याजदर अव्हेलेबल आहे. अगोदर कोणते पेमेंट केल्यास याच्यामध्ये कोणते चार्जेस तुम्हाला इतर लागत नाहीत.
शैक्षणिक कर्ज (Canara Bank Education Loan)
शिक्षणासाठी भारतात किंवा भारतात बाहेर जर मुलांना पाठवायचे असेल तर पैशाचा खर्च भरपूर येतो अशातच कॅनरा बँक या खर्चाला हातभार लावण्यासाठी विविध प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करते, यामध्ये विद्या तुरंत, विद्या शक्ती, विद्या सहाय्यक, आयबीएस स्कीम, कॅनरा आयबीए मॉडल एज्युकेशनल स्कीम अंतर्गत शैक्षणिक कर्जाचा पुरवठा करते.
या बँकेचे व्याजदर सुद्धा खूप कमी आहे आणि तुम्ही याच्यासाठी भारताबाहेर किंवा भारतात जरी कर्जासाठी अर्ज करत असाल तर सहज रित्या कर्ज तुम्हाला मिळू शकते.
वैयक्तिक कर्ज (Canara Bank Loans – Personal Loans)
आपल्या गरजेच्या वैयक्तिक अडचणीच्या वेळेस वैयक्तिक कर्जाचा पर्याय आपल्याकडे असतो, अशातच आपण बघतो की कोणते बँक व्यवस्थित आहे कोणती बँक आपल्याला चांगलं कर्ज देऊ शकते, त्यामध्ये कॅनरा बँक हे एक पर्याय वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही वापरू शकता.
कॅनरा होम लोन प्लस याच्या अंतर्गत होम लोन सोबतच पर्सनल लोन सुद्धा तुम्हाला मिळतो तुम्ही होम लोन घेतलेल असेल तर तुम्हाला सहजरीत्या वैयक्तिक कर्ज इथे दिल्या जात. कॅनरा बजेट, कॅनरा पेन्शन टीचर्स लोन,कॅनरा सेस या अंतर्गत तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळते.
कॅनरा पेन्शन कॅनरा बँके एक्स एम्प्लॉय साठी एक सुविधा आहे जे मी कॅनरा बँक सोबत अगोदर काम केले असेल अशांना ही कॅनरा बँक सहजरीत्या वैयक्तिक कर्ज (Canara Bank Loans) उपलब्ध करून देत, कॅनरा बँकेचा व्याजदर 10.30 टक्क्यापासून पुढे असून तुमच्या सिबिल नुसार तुमच्या रेकॉर्डनुसार याचा व्याजदर कमी जास्त होत असतो.
व्यवसायिक कर्ज (Canara Bank Business Loan)
व्यवसायिक असाल, कोणताही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर व्यवसायासाठी सुद्धा कॅनरा बँक कर्जाचा पुरवठा करते कॅनरा एम एस एम ई स्टार, कॅनरा जीएसटी, कॅनरा महिला विकास, कॅनरा एम एस एम ई स्मार्ट प्रोफेशनल, कॅनरा फायनान्स, कॅनरा MSME कॉन्टॅक्टर, प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि डॉक्टर चॉईस या योजनेअंतर्गत तुम्ही या बँकेमध्ये व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
व्यावसायिक कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता जर तुम्हाला हे कर्ज (Canara Bank Loan) घ्यायचे असतील किंवा वर दिलेल्या कोणत्याही पर्यायांपैकी तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच वरचा कोणताही पर्याय तुमच्यासाठी चांगला होऊ शकतो.
कर्ज घेण्याअगोदर सविस्तर माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहणं गरजेचं आहे वेळोवेळी व्याज दरामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे कॅनरा बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.canarabank.com/ ला भेट देऊन तुम्ही कर्ज विषयीची सखोल माहिती घेऊ शकता