Bank of Maharashtra Loans
व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Bank Of Maharashtra Loans : महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या महाराष्ट्रातच नसून संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या शाखा कार्यरत आहेत, हे बँक नवीन खाते, एटीएम तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करते. या बँकेमार्फत वेगवेगळी दहा कर्ज दिले जातात.

त्यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज व कंजूमर लोनचा पर्याय उपलब्ध आहे. भारतातील अग्रगण्य तसेच महाराष्ट्रातील सर्वश्रुत असणाऱ्या या बँकेचे व्याजदर सुद्धा खूप कमी आहे.

तुम्ही जर या बँकेमार्फत लोन घेण्याचा पर्याय निवडत असाल तर खाली दिलेले विविध लोन तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मधून कर्ज घेऊ शकता, बँक ऑफ महाराष्ट्र मधून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पाच महत्त्वाच्या कर्जाच्या तपशील आपण खाली पाहणार आहोत.

गृह कर्ज (Bank of Maharashtra Home Loan)

महा सुपर हाऊसिंग लोन या प्रकारच्या कर्जामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र नवीन घर घेण्यासाठी, घराचे बांधकाम करण्यासाठी किंवा जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा बँक कर्जाचा पुरवठा करते. या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता जर तुम्ही या कर्जासाठी पात्र असाल तर चांगला बेनिफिट तुम्हाला येथे मिळणार आहे.

बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता कोणतेही हिडन चार्जेस बँकेकडून आकारले जात नाही, व्याजदर पण खूप कमी प्रकारचा आहे आणि महिलांसाठी सुद्धा या प्रकाराच्या कर्जामध्ये तुम्हाला सूट मिळू शकते.

यामध्ये नवीन घर घेण्यासाठी, घराचं बांधकाम वाढवायच असेल तर, घरासाठी एखादी जागा खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी आणि रेनोवेशन करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला गृह कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.

कार लोन (Bank of Maharashtra Loans)

महा सुपर कार लोन स्कीम या प्रकारच्या कर्जामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कार घेण्यासाठी कर्जाचा पुरवठा करते यामध्ये कार असेल तर मल्टी युटिलिटी (MUV) गाड्या असतील SUV असतील त्यांच्यासाठी हे कर्ज मिळतं. तुमचं वय 18 च्यावर असेल तर तुम्ही ह्या प्रकारचं कर्ज घेऊ शकता.

तुम्ही कुठेतरी जॉबला असाल किंवा चांगल्या प्रकारचं तुमचं जर इनकम असेल तर तुम्ही हे कर्ज सहजरीत्या घेऊ शकता यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्ज चा पर्याय उपलब्ध आहे. याचा व्याजदर 8.70 पासून सुरू होतो कमीत कमी कागदपत्रांमध्ये हे व्याजदर तुम्हाला इथं दिल्या जाते.

वाहन कर्जामध्ये बँकेचा जुन्या गाड्यांचे कर्ज, दुचाकी गाडीसाठीच कर्ज, घर व कार साठी कर्ज इत्यादी पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत, यामध्ये तुम्हाला जे हवे असेल ते कर्ज तुम्ही घेऊ शकता. प्रधानमंत्री आवास योजना –  प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत जे अर्जदार पात्र असेल तर अर्जदारांना या बँकेमार्फत कर्जाचा पुरवठा केला जातो.

विविध प्रकारच्या ग्रुपमधून हे कर्ज दिल्या जाते याच्यामध्ये ई डब्ल्यू एस, एल आय जी, एम आय जी वन आणि एमआयजी टू या प्रकाराचा समावेश आहे. कोणीही अर्जदार इथं अर्ज करू शकतो, जर तुम्ही (Bank of Maharashtra Loans) पात्र असाल तुमचा सिबिल स्कोर वगैरे चांगला असेल तर तुम्हाला कमीत कमी 30 लाखापासून 75 लाखापर्यंत कर्ज मिळत.

नवीन फ्लॅट घेण्यासाठी या कर्जाचा उपयोग तुम्ही करू शकता प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाकी आवश्यक डिटेल्स पाहायचे असतील तर बँकेचे वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही सर्व प्रकारचे कर्जाची माहिती घेऊ शकता.

शैक्षणिक कर्ज (Bank of Maharashtra Loans)

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध प्रकारच्या शैक्षणिक बाबींसाठी कर्जाचा पुरवठा केला जातो, 100% फायनान्सिंग तुम्हाला या कर्जाअंतर्गत मिळते. कोणतेही सेक्युरिटी किंवा कोणतेही तारण ठेवण्याची तर गरज पडत नाही. मुलींसाठी जर कर्ज (Bank of Maharashtra Loans) घेत असाल तर व्याजदरामध्ये सुद्धा तिथे सूट मिळणार आहे.

जास्तीत जास्त पंधरा वर्षापर्यंत तुम्ही हे कर्ज घेऊ शकता या कर्ज मध्ये विविध प्रकारचा समावेश आहे ज्यामध्ये मॉडर्न एज्युकेशन लोन, महा स्कॉलर एज्युकेशन लोन, महाबँक इ-लोन आणि इंटरेस्ट सबसिडी स्कीम फॉर एज्युकेशन लोन इत्यादी प्रकारचा समावेश आहे. विद्यालक्षमी पोर्टल अंतर्गत हे लोन तुम्ही सहजरीत्या मिळू शकता.

विद्यालक्षमी पोर्टलवर जायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही या कर्जाची माहिती घेऊ शकता आणि पुढचं कर्ज सुद्धा घेऊ शकता.

पर्सनल लोन-वैयक्तिक कर्ज (Bank of Maharashtra Loan – Personal Loan)

गरजेच्या काळामध्ये वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असते अशा काळामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते. बँक ऑफ महाराष्ट्राच दहा टक्के हे व्याजदर भारतामध्ये सर्वात कमी असलेल्या व्याजदरामध्ये गणलं जात. विविध प्रकारच्या पर्सनल लोन साठी हे बँक वापरू शकता.

यामध्ये जर तुम्ही पगारदार वर्गातून असाल किंवा प्रोफेशनल असल किंवा तुमच्याकडे जर व्यवसाय करत असाल किंवा भारत पेट्रोलियमचे तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र कडून हे कर्ज (Bank of Maharashtra Loans) मिळू शकतात, इतर उमेदवार सुद्धा कर्ज मिळू शकतात परंतु यासाठी तुम्हाला बँकेची एलिजिबिलिटी सर्वात अगोदर चेक करणे गरजेचे आहे.

तुमचे इन्कम कमीत कमी वर्षाला 3 लाख असावं तुमच्या उत्पन्नाच्या 20 पट रक्कम तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात मिळू शकते किंवा जास्तीत जास्त 20 लाख रुपये तुम्हाला कर्ज बँक देते यामध्ये एक टक्का प्रोसेसिंग फी लागेल या व्यतिरिक्त कोणते हिडन चार्जेस तुम्हाला इथे लागणार नाही.

कन्जुमर ड्युरेबल लोन (BOM Consumer Durable Loan)

महा कंजूमर लोन स्कीम मध्यमवर्गीय साठी लॅपटॉप असो कॅम्पुटर असो किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स कोणत्या असो हे घ्यायचा असेल तर दुकानात गेल्यानंतर दोन तीन पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतात त्याच्यामध्ये आयडीएफसी फर्स्ट असेल बजाज फायनान्स असेल किंवा इतर नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या तुम्हाला कर्जाचा पुरवठा सहजरीत्या करतात.

परंतु बँक ऑफ महाराष्ट्र ने महा कंजूमर लोन स्कीम या योजनेअंतर्गत तुम्हाला लॅपटॉप, कॅम्पुटर, इलेक्ट्रॉनिक कोणतेही गॅजेट घेण्यासाठी कर्जाचा पुरवठा करत आहे, यामध्ये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असायला हवं. (Bank of Maharashtra Loans) त्यासोबतच मागच्या दोन वर्षाचे ITR किंवा फॉर्म 16 असले तरी तुम्ही हे कर्ज सहजरीत्या घेऊ शकता.

यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 21 आहे जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही हे कर्ज सहज उपलब्ध करू शकता कमीत कमी 50 हजार व जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत हे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे उपलब्ध होतात, बँकेच्या व्याजदर विषयी व इतर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकृत वेबसाईट https://bankofmaharashtra.in/ याच्यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता या सोबतच बँकेच्या वर दिलेल्या कोणत्या प्रकारचा कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *